S M L

वसईत आढळली अपूर्ण माहितीची 'आधार कार्ड'

19 जानेवारीएकीकडे केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महानगरपालिकेकडून युआयडी-आधार कार्ड काढण्यासाठी अथक प्रयत्न केले जात आहेत. तर दुसरीकडे याच यंत्रणेचा शेवटचा टप्पा असलेल्या वितरण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. कार्डवर अपूर्ण पत्ता असलेली आधार कार्ड वसईतील नवघर पोस्ट ऑफिस मध्ये येऊन पडली आहेत. वसई जनआंदोलन समितीचे आमदार विवेक पंडित यांनी हा प्रकार उघडकीस आणलाय. अशा अपूर्णावस्थेत असलेल्या कार्ड्सचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो आणि अशी कार्ड जर गुन्हेगारांच्या हातात पडली तर त्याचा फटका संबंधित आधार असलेल्या व्यक्तीला बसू शकतो आणि यामुळे महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या आधारच्या हेतूलाच धोका पोहोचतो. यापूर्वी ही कार्ड्स थेट बँगलोरहून स्पीड पोस्ट यंत्रणेतून वितरीत केली जायची मात्र वसईत आलेली ही कार्ड साध्या टपालानं वाशीहून कशी आली असा सवाल विवेक पंडित यांनी उपस्थित केलाय. अशा परिस्थितीत ज्यांनी या कार्डांची नोंदणी केलीय त्यांच्यापर्यंत ही कार्ड कशी पोहोचवायची त्यामुळे ही कार्ड पोस्ट ऑफिसमध्येच पडून राहण्याची भीती निर्माण झाल्याची शंका विवेक पंडित यांनी बोलून दाखवलीय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 19, 2013 10:53 AM IST

वसईत आढळली अपूर्ण माहितीची 'आधार कार्ड'

19 जानेवारी

एकीकडे केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महानगरपालिकेकडून युआयडी-आधार कार्ड काढण्यासाठी अथक प्रयत्न केले जात आहेत. तर दुसरीकडे याच यंत्रणेचा शेवटचा टप्पा असलेल्या वितरण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. कार्डवर अपूर्ण पत्ता असलेली आधार कार्ड वसईतील नवघर पोस्ट ऑफिस मध्ये येऊन पडली आहेत. वसई जनआंदोलन समितीचे आमदार विवेक पंडित यांनी हा प्रकार उघडकीस आणलाय.

अशा अपूर्णावस्थेत असलेल्या कार्ड्सचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो आणि अशी कार्ड जर गुन्हेगारांच्या हातात पडली तर त्याचा फटका संबंधित आधार असलेल्या व्यक्तीला बसू शकतो आणि यामुळे महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या आधारच्या हेतूलाच धोका पोहोचतो. यापूर्वी ही कार्ड्स थेट बँगलोरहून स्पीड पोस्ट यंत्रणेतून वितरीत केली जायची मात्र वसईत आलेली ही कार्ड साध्या टपालानं वाशीहून कशी आली असा सवाल विवेक पंडित यांनी उपस्थित केलाय. अशा परिस्थितीत ज्यांनी या कार्डांची नोंदणी केलीय त्यांच्यापर्यंत ही कार्ड कशी पोहोचवायची त्यामुळे ही कार्ड पोस्ट ऑफिसमध्येच पडून राहण्याची भीती निर्माण झाल्याची शंका विवेक पंडित यांनी बोलून दाखवलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 19, 2013 10:53 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close