S M L

अंधेरीत कारच्या धडकेत दोन महिला ठार

22 जानेवारीमुंबईत अंधेरीतील जोगेश्वरी - लिंक रोडवर भरधाव इंडिका कारने 6 महिलांना धडक दिली. यात दोन महिलांचा जागीच मृत्यू झालाय. संगीता वानन आणि रेखा होनाळे अशी दोघींची नावं आहेत. सिप्झ कंपनीच्या गेट नं 3 समोर ही घटना घडली. सकाळी 6 वाजता मार्निंग वॉकला निघालेल्या या महिलांना भरधाव वेगात आलेल्या इंडिका कारने जबर धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की, जागेवरच संगीता वानन आणि रेखा होनाळे या महिलांचा मृत्यू झाला. तर इतर जखमी महिलांना होलीक्रॉस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. याप्रकरणी गाडीचा ड्रायव्हर प्रविण कनोजियाला स्थानिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 22, 2013 10:30 AM IST

अंधेरीत कारच्या धडकेत दोन महिला ठार

22 जानेवारी

मुंबईत अंधेरीतील जोगेश्वरी - लिंक रोडवर भरधाव इंडिका कारने 6 महिलांना धडक दिली. यात दोन महिलांचा जागीच मृत्यू झालाय. संगीता वानन आणि रेखा होनाळे अशी दोघींची नावं आहेत. सिप्झ कंपनीच्या गेट नं 3 समोर ही घटना घडली. सकाळी 6 वाजता मार्निंग वॉकला निघालेल्या या महिलांना भरधाव वेगात आलेल्या इंडिका कारने जबर धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की, जागेवरच संगीता वानन आणि रेखा होनाळे या महिलांचा मृत्यू झाला. तर इतर जखमी महिलांना होलीक्रॉस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. याप्रकरणी गाडीचा ड्रायव्हर प्रविण कनोजियाला स्थानिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 22, 2013 10:30 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close