S M L

पहिल्या दिवशी कांगारूंची शरणागती, भारताचे वर्चस्व

02 मार्चभारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरी टेस्ट आज हैदराबादमध्ये खेळवली जात आहे. आज पहिल्या दिवसावर यजमान भारतानं वर्चस्व गाजवलं आहे. ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन मायकेल क्लार्कचा अपवाद वगळता ऑस्ट्रेलियाच्या इतर बॅट्समननं भारतीय बॉलिंगसमोर सपशेल शरणागती पत्करली. ऑस्ट्रेलियानं पहिल्या इनिंगमध्ये 9 विकेट गमावत 237 रन्सवर आपली पहिली इनिंग घोषित केली. कॅप्टन मायकेल क्लार्कची सेंच्युरी थोडक्यात हुकली. तो 91 रन्सवर आऊट झाला. भारतातर्फे भुवनेश्वर कुमार आणि रविंद्र जडेजाने प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. तर हरभजन सिंगला 2 आणि आर अश्विनला 1 विकेट घेण्यात यश आलं. याला उत्तर देताना भारतानं पहिल्या दिवसअखेर बिनबाद 5 रन्स केले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 2, 2013 01:02 PM IST

पहिल्या दिवशी कांगारूंची शरणागती, भारताचे वर्चस्व

02 मार्च

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरी टेस्ट आज हैदराबादमध्ये खेळवली जात आहे. आज पहिल्या दिवसावर यजमान भारतानं वर्चस्व गाजवलं आहे. ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन मायकेल क्लार्कचा अपवाद वगळता ऑस्ट्रेलियाच्या इतर बॅट्समननं भारतीय बॉलिंगसमोर सपशेल शरणागती पत्करली. ऑस्ट्रेलियानं पहिल्या इनिंगमध्ये 9 विकेट गमावत 237 रन्सवर आपली पहिली इनिंग घोषित केली. कॅप्टन मायकेल क्लार्कची सेंच्युरी थोडक्यात हुकली. तो 91 रन्सवर आऊट झाला. भारतातर्फे भुवनेश्वर कुमार आणि रविंद्र जडेजाने प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. तर हरभजन सिंगला 2 आणि आर अश्विनला 1 विकेट घेण्यात यश आलं. याला उत्तर देताना भारतानं पहिल्या दिवसअखेर बिनबाद 5 रन्स केले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 2, 2013 01:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close