S M L

लोकलचा पास आता वर्षभरासाठी खास

17 जानेवारीमुंबईची 'लाईफलाईन' अर्थात लोकल सेवा आता महागाईच्या ट्रकवर सुसाट धावणार आहे. दहावर्षांनंतर केलेल्या रेल्वेप्रवासाच्या दरवाढीत मुंबईकरांच्या खिश्यातून 1 ते 5 रुपयांची वसुली होणार आहे. येत्या 22 जानेवारीपासून लोकल प्रवास आणखी महागणार आहे. रेल्वेनं केलेल्या दरवाढीनुसार नवीन दर 22 जानेवारीपासून लागू होणार आहेत. साधारणता 1 ते 5 रुपयांपर्यंत ही दरवाढ आहे. पण त्याचबरोबर मध्य रेल्वे मार्गावर आता प्रवाशांना लोकलचा पास सहा महिने आणि वर्षभरासाठी मिळणार आहे. याआधी हा पास फक्त तीन महिन्यांसाठी मिळत असे पण आता सहा महिने आणि वर्षभरासाठीही मिळणार आहे. मात्र पासमध्ये दरवाढ केल्याप्रमाणे सीएसटी ते कल्याण मासिक पाससाठी पुर्वी 235 रुपये मोजावे लागत होते आता त्या पाससाठी 280 रूपये मोजावे लागणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 17, 2013 12:59 PM IST

लोकलचा पास आता वर्षभरासाठी खास

17 जानेवारी

मुंबईची 'लाईफलाईन' अर्थात लोकल सेवा आता महागाईच्या ट्रकवर सुसाट धावणार आहे. दहावर्षांनंतर केलेल्या रेल्वेप्रवासाच्या दरवाढीत मुंबईकरांच्या खिश्यातून 1 ते 5 रुपयांची वसुली होणार आहे. येत्या 22 जानेवारीपासून लोकल प्रवास आणखी महागणार आहे. रेल्वेनं केलेल्या दरवाढीनुसार नवीन दर 22 जानेवारीपासून लागू होणार आहेत. साधारणता 1 ते 5 रुपयांपर्यंत ही दरवाढ आहे. पण त्याचबरोबर मध्य रेल्वे मार्गावर आता प्रवाशांना लोकलचा पास सहा महिने आणि वर्षभरासाठी मिळणार आहे. याआधी हा पास फक्त तीन महिन्यांसाठी मिळत असे पण आता सहा महिने आणि वर्षभरासाठीही मिळणार आहे. मात्र पासमध्ये दरवाढ केल्याप्रमाणे सीएसटी ते कल्याण मासिक पाससाठी पुर्वी 235 रुपये मोजावे लागत होते आता त्या पाससाठी 280 रूपये मोजावे लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 17, 2013 12:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close