S M L

अखेर बारावीच्या पेपर तपासणीवरचा बहिष्कार मागे

13 मार्चमुंबई : - गेल्या 20 दिवसांपासून शिक्षकांचा उत्तरपत्रिका तपासणीवर टाकलेल्या बहिष्कार अखेर मागे घेतला आहे. ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षकांनी आपला बहिष्कार मागे घेतला आहे. आज विधानसभेत शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी एक निवेदन सादर केलं. यात शिक्षकांच्या तीन मागण्या मान्य केल्या आहेत. येत्या दोन महिन्यात इतर मागण्यांवर निर्णय घेतला जाईल असं आश्वासनही दर्डा यांनी दिलं. दर्डा यांच्या निवेदनानंतर ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षकांनी आपला बहिष्कार मागे घेण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे बारावीच्या उत्तर पत्रिका तपासणीचा मार्ग मोकळा झाला आहे. आता ज्युनिअर शिक्षकांनी बहिष्कार मागे घेतल्यामुळे विद्यापीठातील प्राध्यापकांच्या संपातील हवा निघाल्याची चर्चा सुरू झालीय.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 13, 2013 12:31 PM IST

अखेर बारावीच्या पेपर तपासणीवरचा बहिष्कार मागे

13 मार्च

मुंबई : - गेल्या 20 दिवसांपासून शिक्षकांचा उत्तरपत्रिका तपासणीवर टाकलेल्या बहिष्कार अखेर मागे घेतला आहे. ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षकांनी आपला बहिष्कार मागे घेतला आहे. आज विधानसभेत शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी एक निवेदन सादर केलं. यात शिक्षकांच्या तीन मागण्या मान्य केल्या आहेत. येत्या दोन महिन्यात इतर मागण्यांवर निर्णय घेतला जाईल असं आश्वासनही दर्डा यांनी दिलं. दर्डा यांच्या निवेदनानंतर ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षकांनी आपला बहिष्कार मागे घेण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे बारावीच्या उत्तर पत्रिका तपासणीचा मार्ग मोकळा झाला आहे. आता ज्युनिअर शिक्षकांनी बहिष्कार मागे घेतल्यामुळे विद्यापीठातील प्राध्यापकांच्या संपातील हवा निघाल्याची चर्चा सुरू झालीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 13, 2013 12:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close