S M L

नंदूरबारमध्ये 7 कॉपी'दाते' शिक्षक निलंबित

25 फेब्रुवारी'कुंपणच शेत खातं' याचा प्रत्यय नंदूरबारमध्ये बारावीच्या परीक्षेत आलाय. कॉपीबहाद्दूर विद्यार्थ्यांना पर्यवेक्षकच 'फोनोफ्रेंड' बनले आणि विद्यार्थ्यांना मोबाईल फोन दिल्याची धक्कादायक आणि लाजिरवाणी घटना नंदूरबारमध्ये घडली होती. आता या प्रकरणी एका शिक्षकाला निलंबित करण्यात आले असून जिल्हाभरात कॉपीप्रकरणी आतापर्यंत वेगवेगळ्या शाळांमधले तब्बल 6 शिक्षक निलंबित करण्यात आले आहे. जिल्हाधिकार्‍यांनी थेट कारवाई करत कॉपी'दात्या' शिक्षकांना चांगलाच 'धडा' शिकवला आहे. मागिल आठवड्यात शनिवारी नंदूरबारमधल्या डी आर हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी कॉपीसाठी चक्क मोबाईलचा वापर करत असल्याचा प्रकार आयबीएन लोकमतने उघडकीस आणला होता. परीक्षा हॉलमध्ये मोबाईल न्यायला साफ मनाई असते. मात्र विद्यार्थ्यांचे 'जिवलग' मित्र आणि पालकच आपल्या पाल्याला चोरून मोबाईल फोन आणून देत होते. परीक्षा केंद्राच्या शंभर मिटर आवारात इतरांना येण्यास मनाई आहे. मात्र सगळे नियम धाब्यावर बसवून आपल्या पाल्याच्या 'उज्ज्वल' भवितव्यासाठी पालकांनीच कॉपी पुरवली. याहूनही धक्कादायक म्हणजे परीक्षा हॉलमधील पर्यवेक्षकांनीच विद्यार्थ्यांना मोबाईल फोन दिल्याचं उघडकीला आलं होतं. अखेर दोन दिवसांनंतर शाळेच्या प्रशासनाने एका शिक्षकाला तडकाफडकी निलंबित केलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 25, 2013 12:02 PM IST

नंदूरबारमध्ये 7 कॉपी'दाते' शिक्षक निलंबित

25 फेब्रुवारी

'कुंपणच शेत खातं' याचा प्रत्यय नंदूरबारमध्ये बारावीच्या परीक्षेत आलाय. कॉपीबहाद्दूर विद्यार्थ्यांना पर्यवेक्षकच 'फोनोफ्रेंड' बनले आणि विद्यार्थ्यांना मोबाईल फोन दिल्याची धक्कादायक आणि लाजिरवाणी घटना नंदूरबारमध्ये घडली होती. आता या प्रकरणी एका शिक्षकाला निलंबित करण्यात आले असून जिल्हाभरात कॉपीप्रकरणी आतापर्यंत वेगवेगळ्या शाळांमधले तब्बल 6 शिक्षक निलंबित करण्यात आले आहे. जिल्हाधिकार्‍यांनी थेट कारवाई करत कॉपी'दात्या' शिक्षकांना चांगलाच 'धडा' शिकवला आहे. मागिल आठवड्यात शनिवारी नंदूरबारमधल्या डी आर हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी कॉपीसाठी चक्क मोबाईलचा वापर करत असल्याचा प्रकार आयबीएन लोकमतने उघडकीस आणला होता. परीक्षा हॉलमध्ये मोबाईल न्यायला साफ मनाई असते. मात्र विद्यार्थ्यांचे 'जिवलग' मित्र आणि पालकच आपल्या पाल्याला चोरून मोबाईल फोन आणून देत होते. परीक्षा केंद्राच्या शंभर मिटर आवारात इतरांना येण्यास मनाई आहे. मात्र सगळे नियम धाब्यावर बसवून आपल्या पाल्याच्या 'उज्ज्वल' भवितव्यासाठी पालकांनीच कॉपी पुरवली. याहूनही धक्कादायक म्हणजे परीक्षा हॉलमधील पर्यवेक्षकांनीच विद्यार्थ्यांना मोबाईल फोन दिल्याचं उघडकीला आलं होतं. अखेर दोन दिवसांनंतर शाळेच्या प्रशासनाने एका शिक्षकाला तडकाफडकी निलंबित केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 25, 2013 12:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close