S M L

शाहरूखला भारतात सुरक्षा द्यावी -मलिक

29 जानेवारीअभिनेता शाहरूख खानच्या वक्तव्यावरून आता नवा वाद निर्माण झालाय. भारतात असुरक्षित वाटत असल्यानं शाहरूखला भारत सरकारनं सुरक्षा द्यावी अशी आगाऊ मागणी पाकिस्तानचे गृहमंत्री रहेमान मलिक यांनी केली आहे. मलिक एवढ्यावर थांबले नाही तर शाहरूखचे चाहते पाकिस्तानमध्ये पण आहे आणि भारतात सुद्धा आहे. त्यामुळे भारतीय मुस्लिम बांधवांनी त्याच्याबद्दल नकारात्मक विचार करू नये त्याच्याबद्दल नकारात्मक विचार करणे म्हणजे त्याला धमकी दिल्या सारखं आहे अशी मुक्ताफळंही मलिक यांनी उधळली. मुंबईवर झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातला मास्टरमाईंड कुख्यात दहशतवादी हाफिज सईद याने शाहरूखला पाकिस्तानात येण्याचं निमंत्रण दिलं आहे. अमेरिकेतल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या हल्ल्यानंतर मुस्लिम समाजाबद्दल एक संशयाचं वातावरण निर्माण झालंय. मलाही त्याचा अनुभव आलाय. त्यामुळं भारतातही मला कधी कधी असुरक्षित वाटतं असं शाहरूखनं एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं. मात्रआम्ही आमच्या नागरिकांची सुरक्षा करण्यासाठी समर्थ आहोत असं चोख उत्तर भारताचे गृहसचिव आर के सिंग यांनी पाकिस्तानला दिलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 29, 2013 10:35 AM IST

शाहरूखला भारतात सुरक्षा द्यावी -मलिक

29 जानेवारी

अभिनेता शाहरूख खानच्या वक्तव्यावरून आता नवा वाद निर्माण झालाय. भारतात असुरक्षित वाटत असल्यानं शाहरूखला भारत सरकारनं सुरक्षा द्यावी अशी आगाऊ मागणी पाकिस्तानचे गृहमंत्री रहेमान मलिक यांनी केली आहे. मलिक एवढ्यावर थांबले नाही तर शाहरूखचे चाहते पाकिस्तानमध्ये पण आहे आणि भारतात सुद्धा आहे. त्यामुळे भारतीय मुस्लिम बांधवांनी त्याच्याबद्दल नकारात्मक विचार करू नये त्याच्याबद्दल नकारात्मक विचार करणे म्हणजे त्याला धमकी दिल्या सारखं आहे अशी मुक्ताफळंही मलिक यांनी उधळली. मुंबईवर झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातला मास्टरमाईंड कुख्यात दहशतवादी हाफिज सईद याने शाहरूखला पाकिस्तानात येण्याचं निमंत्रण दिलं आहे. अमेरिकेतल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या हल्ल्यानंतर मुस्लिम समाजाबद्दल एक संशयाचं वातावरण निर्माण झालंय. मलाही त्याचा अनुभव आलाय. त्यामुळं भारतातही मला कधी कधी असुरक्षित वाटतं असं शाहरूखनं एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं. मात्रआम्ही आमच्या नागरिकांची सुरक्षा करण्यासाठी समर्थ आहोत असं चोख उत्तर भारताचे गृहसचिव आर के सिंग यांनी पाकिस्तानला दिलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 29, 2013 10:35 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close