S M L

नाट्य परिषदेच्या मतपत्रिकांची त्रिसदस्यीय समितीकडून पडताळणी

19 फेब्रुवारीमुंबईत नाट्य परिषदेच्या मतमोजणीतही नाट्य रंगलंय. दीड हजारपेक्षा जास्त डुप्लिकेट मतपत्रिका सापडल्याने मतमोजणीला स्थगिती देण्यात आली आहे. त्रिसदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली. अजित मोडक, विनायक रानडे आणि प्रदीप जगताप हे या समितीत आहेत. यांना दोन दिवसांत निर्णय द्या, असं सांगण्यात आलं आहे. पण अभिनेते प्रदीप कबरे यांनी त्रिसदस्यीय समितीवरच आक्षेप घेतला आहे. हे तीन सदस्य खरंच एक्सपर्ट आहेत का ? याची शहानिशा न करता त्यांना मुंबईला पाठवण्यात आल्याचा आरोप कबरे यांनी केला आहे. सोमवारी ऐन मतदानाच्या दिवशी मुंबईत नाट्य परिषदेच्या मतमोजणीत संख्येपेक्षा जास्त डुप्लिकेट मतपत्रिका सापडल्याने मतमोजणीला स्थगिती देण्यात आली. 73 डुप्लिकेट मतपत्रिका सापडल्यात. मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रात मोहन जोशी आघाडीवर आहेत. नाट्यपरिषदेच्या एकूण 45 जागांपैकी मुंबईत 16 जागा आहेत. तर उर्वरित महाराष्ट्रातल्या 22 जागांची मतमोजणी पूर्ण झाली. या निकालात मोहन जोशी आघाडीवर आहे. त्यांना 12 जागा मिळाल्या आहे तर विनय आपटेंकडे 8 जागा मिळाल्या आहेत. 2 जागांवर तटस्थ उमेदवार विजयी झाले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 19, 2013 09:37 AM IST

नाट्य परिषदेच्या मतपत्रिकांची त्रिसदस्यीय समितीकडून पडताळणी

19 फेब्रुवारी

मुंबईत नाट्य परिषदेच्या मतमोजणीतही नाट्य रंगलंय. दीड हजारपेक्षा जास्त डुप्लिकेट मतपत्रिका सापडल्याने मतमोजणीला स्थगिती देण्यात आली आहे. त्रिसदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली. अजित मोडक, विनायक रानडे आणि प्रदीप जगताप हे या समितीत आहेत. यांना दोन दिवसांत निर्णय द्या, असं सांगण्यात आलं आहे. पण अभिनेते प्रदीप कबरे यांनी त्रिसदस्यीय समितीवरच आक्षेप घेतला आहे. हे तीन सदस्य खरंच एक्सपर्ट आहेत का ? याची शहानिशा न करता त्यांना मुंबईला पाठवण्यात आल्याचा आरोप कबरे यांनी केला आहे. सोमवारी ऐन मतदानाच्या दिवशी मुंबईत नाट्य परिषदेच्या मतमोजणीत संख्येपेक्षा जास्त डुप्लिकेट मतपत्रिका सापडल्याने मतमोजणीला स्थगिती देण्यात आली. 73 डुप्लिकेट मतपत्रिका सापडल्यात. मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रात मोहन जोशी आघाडीवर आहेत. नाट्यपरिषदेच्या एकूण 45 जागांपैकी मुंबईत 16 जागा आहेत. तर उर्वरित महाराष्ट्रातल्या 22 जागांची मतमोजणी पूर्ण झाली. या निकालात मोहन जोशी आघाडीवर आहे. त्यांना 12 जागा मिळाल्या आहे तर विनय आपटेंकडे 8 जागा मिळाल्या आहेत. 2 जागांवर तटस्थ उमेदवार विजयी झाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 19, 2013 09:37 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close