S M L

स्वराज यांच्याशिवाय इतर नावांवरही चर्चेला सेना तयार

31 जानेवारीभाजपमध्ये पंतप्रधानपदावरून सुरू असलेल्या वादावर शिवसेनेनं सावध भूमिका घेतली आहे. बाळासाहेब ठाकरेंनी पंतप्रधानपदासाठी सुषमा स्वराज यांच्या नावाला पसंती दिली होती. पण आज सामनाला दिलेल्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी सुषमा स्वराज यांच्याशिवायही काही नावं असतील तर त्यांच्यावर चर्चा करायची तयारी दाखवली आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्यावेळी जसा गोंधळ झाला होता, तसा गोंधळ होऊ नये म्हणून आत्ताच पंतप्रधानपदाचा उमेदवार निश्चित करावा असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहे. तसंच शरद पवार पंतप्रधान म्हणून स्विकार करणे अवघड आहे. त्यांनी जर शिवसेनेचा हिंदुत्वाचा मुद्दा मान्य करावा. आमच्या ध्येय धोरणात तडजोड होणार नाही. हे ही खरे आहे की,शरद पवार बाळासाहेबांचे चांगले मित्र आहे. पण बाळासाहेबांनी राजकारणातल्या शरद पवारांच्या भूमिकेला नेहमी विरोध केला होता. त्यामुळे मराठी माणूस आहे म्हणून कोणताही माणूस चालणार असे नाही. शरद पवार दिल्लीत असतात पण त्यांनी बेळगावातील मराठी बांधवांसाठी काय केलं ? त्यामुळे मराठी माणूस म्हणून त्यांचा उपयोग काय अशी टीकाही ठाकरे यांनी केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 31, 2013 10:25 AM IST

स्वराज यांच्याशिवाय इतर नावांवरही चर्चेला सेना तयार

31 जानेवारी

भाजपमध्ये पंतप्रधानपदावरून सुरू असलेल्या वादावर शिवसेनेनं सावध भूमिका घेतली आहे. बाळासाहेब ठाकरेंनी पंतप्रधानपदासाठी सुषमा स्वराज यांच्या नावाला पसंती दिली होती. पण आज सामनाला दिलेल्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी सुषमा स्वराज यांच्याशिवायही काही नावं असतील तर त्यांच्यावर चर्चा करायची तयारी दाखवली आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्यावेळी जसा गोंधळ झाला होता, तसा गोंधळ होऊ नये म्हणून आत्ताच पंतप्रधानपदाचा उमेदवार निश्चित करावा असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहे. तसंच शरद पवार पंतप्रधान म्हणून स्विकार करणे अवघड आहे. त्यांनी जर शिवसेनेचा हिंदुत्वाचा मुद्दा मान्य करावा. आमच्या ध्येय धोरणात तडजोड होणार नाही. हे ही खरे आहे की,शरद पवार बाळासाहेबांचे चांगले मित्र आहे. पण बाळासाहेबांनी राजकारणातल्या शरद पवारांच्या भूमिकेला नेहमी विरोध केला होता. त्यामुळे मराठी माणूस आहे म्हणून कोणताही माणूस चालणार असे नाही. शरद पवार दिल्लीत असतात पण त्यांनी बेळगावातील मराठी बांधवांसाठी काय केलं ? त्यामुळे मराठी माणूस म्हणून त्यांचा उपयोग काय अशी टीकाही ठाकरे यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 31, 2013 10:25 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close