S M L

दोन घटनांमध्ये 4 अल्पवयीन मुलींवर बलात्कार

05 मार्चभंडार्‍यात तीन अल्पवयीन मुलींवर बलात्कार करून हत्येची घटना ताजी असतानाच अमरावती जिल्ह्यातल्या हिरपूर इथं तीन अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याचं उघड झालं आहे. याप्रकरणी ज्ञानेश्वर मारकम याला तळेगाव पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना पंधरा दिवसांपूर्वी घडली होती. ज्ञानेश्वर मारकम (वय 45) यानं या मुलींना स्वतःच्या घरात बोलावून बलात्कार केला होता. पीडित मुली ह्या वेगवेगळ्या कुटुंबातील आहे. पीडित मुलींपैकी एक सहा वर्षांची आहे आणि दोन सात वर्षांच्या आहेत. 15 दिवसांपुर्वी घराशेजारी खेळत असतांना नराधम ज्ञानेश्वर मारकम खाऊचे आमिष देऊन मुलींना घरात नेले आणि अत्याचार केला. याप्रकरणी 15 दिवसांनंतर पीडित मुलीच्या आईने गुन्हा दाखल केला. यानंतर पोलिसांनी तातडीने मारकमला अटक केली. त्याला आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे नागपुरच्या शांतीनगर भागात एका दहावर्षीय मुलीवर शाळेच्या बाहेर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलेल नाही. सकाळी साडेसहा वाजता शाळेत जातांना अज्ञात व्यक्तीने या मुलीवर बलात्कार केला. या घटनेत मुलगी जखमीही झाली असून तिला मेयो हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 5, 2013 01:34 PM IST

दोन घटनांमध्ये 4 अल्पवयीन मुलींवर बलात्कार

05 मार्च

भंडार्‍यात तीन अल्पवयीन मुलींवर बलात्कार करून हत्येची घटना ताजी असतानाच अमरावती जिल्ह्यातल्या हिरपूर इथं तीन अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याचं उघड झालं आहे. याप्रकरणी ज्ञानेश्वर मारकम याला तळेगाव पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना पंधरा दिवसांपूर्वी घडली होती. ज्ञानेश्वर मारकम (वय 45) यानं या मुलींना स्वतःच्या घरात बोलावून बलात्कार केला होता. पीडित मुली ह्या वेगवेगळ्या कुटुंबातील आहे. पीडित मुलींपैकी एक सहा वर्षांची आहे आणि दोन सात वर्षांच्या आहेत. 15 दिवसांपुर्वी घराशेजारी खेळत असतांना नराधम ज्ञानेश्वर मारकम खाऊचे आमिष देऊन मुलींना घरात नेले आणि अत्याचार केला. याप्रकरणी 15 दिवसांनंतर पीडित मुलीच्या आईने गुन्हा दाखल केला. यानंतर पोलिसांनी तातडीने मारकमला अटक केली. त्याला आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे नागपुरच्या शांतीनगर भागात एका दहावर्षीय मुलीवर शाळेच्या बाहेर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलेल नाही. सकाळी साडेसहा वाजता शाळेत जातांना अज्ञात व्यक्तीने या मुलीवर बलात्कार केला. या घटनेत मुलगी जखमीही झाली असून तिला मेयो हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 5, 2013 01:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close