S M L

आदित्य ठाकरेंना मिळणार शिवसेनेचं नेतेपद ?

22 जानेवारीशिवसेनेचे युवराज आदित्य ठाकरे आता शिवसेनेचे नेते होणार आहे. कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याकडे सर्वाधिकार देण्यात येणार आहे त्यापाठोपाठ आता आदित्य ठाकरे यांना शिवसेनेचं नेतेपद मिळणार आहे. आदित्य ठाकरेंना नेतेपद देण्याविषयीचा ठराव उद्याच्या बैठकीत मांडला जाणार आहे. ठराव संमत झाल्यास आदित्य ठाकरे शिवसेनेचा सर्वात तरुण नेते होतील. उद्या अर्थात 23 जानेवारीला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिन.. यादिवसाचे औचित्य साधून शिवसेना 2014 च्या निवडणुकांच्या दृष्टीने नवे निर्णय घेणारा आहे. त्यातला महत्त्वाचामुद्दा म्हणजे उद्धव ठाकरे यांची अध्यक्षपदी निवड होणार आहे. याबद्दल शिवसेनेनं सोमवारी माहिती दिली. उद्या बुधवारी शिवसेनेच्या जेष्ठ नेत्यांची बैठक होणार आहेत. या बैठकीत कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना औपचारिकपणे सर्वाधिकार बहाल केले जाणार आहे. याचवेळी शिवसेनेचं युवा नेतृत्व सांभाळणारे आदित्य ठाकरे आता शिवसेनेच्या सक्रिय राजकारणात एंट्री करणार आहे. आदित्य ठाकरे यांना सेनेचं नेतेपद देण्याची शक्यता आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर आपण कार्याध्यक्ष म्हणूनच काम करू शिवसेनाप्रमुखपद कधीही स्विकारणार नाही बाळासाहेब ठाकरेच शिवसेनाप्रमुख राहतील त्यांच्याशिवाय दुसरा कोणीही या पदावर बसू शकत नाही असं उध्दव ठाकरे यांनी याआधीच सांगितलंय. बाळासाहेबांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी राज्यभराचा दौरा करून सर्व कार्यकर्ते, नेत्यांनी भेट घेतली पण उद्धव ठाकरे गडावर पोहचताच राज्यभरात पक्षातील धुसफूस चव्हाट्यावर आली. नाशिक,कोकणात शिवसेनेला हादरे बसले. आता पक्षाच्या एकसंध बांधणीसाठी उद्धव ठाकरे यांनी फेब्रुवारी महिन्यात राज्याव्यापी दौरा करणार आहे. या दौर्‍यातून डॅमेज कंट्रोल रोखण्याचे उद्धव यांच्यापुढे आव्हान असणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 22, 2013 01:00 PM IST

आदित्य ठाकरेंना मिळणार शिवसेनेचं नेतेपद ?

22 जानेवारी

शिवसेनेचे युवराज आदित्य ठाकरे आता शिवसेनेचे नेते होणार आहे. कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याकडे सर्वाधिकार देण्यात येणार आहे त्यापाठोपाठ आता आदित्य ठाकरे यांना शिवसेनेचं नेतेपद मिळणार आहे. आदित्य ठाकरेंना नेतेपद देण्याविषयीचा ठराव उद्याच्या बैठकीत मांडला जाणार आहे. ठराव संमत झाल्यास आदित्य ठाकरे शिवसेनेचा सर्वात तरुण नेते होतील. उद्या अर्थात 23 जानेवारीला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिन.. यादिवसाचे औचित्य साधून शिवसेना 2014 च्या निवडणुकांच्या दृष्टीने नवे निर्णय घेणारा आहे. त्यातला महत्त्वाचामुद्दा म्हणजे उद्धव ठाकरे यांची अध्यक्षपदी निवड होणार आहे. याबद्दल शिवसेनेनं सोमवारी माहिती दिली. उद्या बुधवारी शिवसेनेच्या जेष्ठ नेत्यांची बैठक होणार आहेत. या बैठकीत कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना औपचारिकपणे सर्वाधिकार बहाल केले जाणार आहे. याचवेळी शिवसेनेचं युवा नेतृत्व सांभाळणारे आदित्य ठाकरे आता शिवसेनेच्या सक्रिय राजकारणात एंट्री करणार आहे. आदित्य ठाकरे यांना सेनेचं नेतेपद देण्याची शक्यता आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर आपण कार्याध्यक्ष म्हणूनच काम करू शिवसेनाप्रमुखपद कधीही स्विकारणार नाही बाळासाहेब ठाकरेच शिवसेनाप्रमुख राहतील त्यांच्याशिवाय दुसरा कोणीही या पदावर बसू शकत नाही असं उध्दव ठाकरे यांनी याआधीच सांगितलंय. बाळासाहेबांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी राज्यभराचा दौरा करून सर्व कार्यकर्ते, नेत्यांनी भेट घेतली पण उद्धव ठाकरे गडावर पोहचताच राज्यभरात पक्षातील धुसफूस चव्हाट्यावर आली. नाशिक,कोकणात शिवसेनेला हादरे बसले. आता पक्षाच्या एकसंध बांधणीसाठी उद्धव ठाकरे यांनी फेब्रुवारी महिन्यात राज्याव्यापी दौरा करणार आहे. या दौर्‍यातून डॅमेज कंट्रोल रोखण्याचे उद्धव यांच्यापुढे आव्हान असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 22, 2013 01:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close