S M L

मुंबईच्या सुरक्षेत वाढ,अफवांवर विश्वास ठेवू नये -सिंग

22 फेब्रुवारीहैदराबाद येथे झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. हैद्राबाद येथील घटनेच्या तपासाला मुंबई पोलीस लागले आहे. दहशतवादाशी मुकाबला करण्यासाठी मुंबई पोलिसांनी विशेष प्रशिक्षण देण्यात आलं आहे. या विशेष पथकातील अधिकारी कर्मचारी तपास करत असल्याची माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांनी दिली. हैद्राबाद येथे झालेल्या बॉम्ब स्फोटानंतर मुंबईतील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे अशी माहितीही त्यांनी दिली. शहरातील महत्वाच्या ठिकाणांना संरक्षण वाढवण्यात आलंय. मुंबईकरांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, घाबरु नये, एखादी अनोळखी वस्तू दिसल्यास तत्काळ नजीकच्या पोलीस स्टेशनला कळावावं असं आवाहन ही सत्यपाल सिंग यांनी केलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 22, 2013 12:03 PM IST

मुंबईच्या सुरक्षेत वाढ,अफवांवर विश्वास ठेवू नये -सिंग

22 फेब्रुवारी

हैदराबाद येथे झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. हैद्राबाद येथील घटनेच्या तपासाला मुंबई पोलीस लागले आहे. दहशतवादाशी मुकाबला करण्यासाठी मुंबई पोलिसांनी विशेष प्रशिक्षण देण्यात आलं आहे. या विशेष पथकातील अधिकारी कर्मचारी तपास करत असल्याची माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांनी दिली. हैद्राबाद येथे झालेल्या बॉम्ब स्फोटानंतर मुंबईतील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे अशी माहितीही त्यांनी दिली. शहरातील महत्वाच्या ठिकाणांना संरक्षण वाढवण्यात आलंय. मुंबईकरांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, घाबरु नये, एखादी अनोळखी वस्तू दिसल्यास तत्काळ नजीकच्या पोलीस स्टेशनला कळावावं असं आवाहन ही सत्यपाल सिंग यांनी केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 22, 2013 12:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close