S M L

अखेर शाहिन-रेणूची आरोपातून मुक्तता

31 जानेवारीपालघर फेसबुक प्रकरणी अखेर शाहिन धाडा आणि रेणू श्रीनिवासन यांची आरोपातून मुक्तता करण्यात आली आहे. पालघर न्यायालयानेतक्रारदार भूषण संखेचा अर्ज फेटाळून लावला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर राज्यभरात स्वंघोषित बंद पुकारण्यात आला होता. मात्र पालघर येथील रहिवासी शाहिन धाडा या तरूणींने आपल्या फेसबुक अकाऊंटवर बंदविरोधात कॉमेंट पोस्ट केली होती. बाळासाहेब ठाकरेंसारखी लोकं रोज जन्मतात आणि मरतात मग यासाठी बंद करण्याची काय गरज आहे ? अशी कमेंट केली होती. तिच्या या कमेंटला तिच्या मैत्रिणीनं लाईक केलं. पण या कमेंटमुळे भडकलेल्या काही शिवसैनिकांनी मुलीच्या नातेवाईकाच्या हॉस्पिटलमध्ये दगडफेक केली. हॉस्पिटलमध्ये घुसून फर्निचर, उपकरणाची तोडफोड केली. यानंतर पोलिसांनी त्या मुलीलाच अटक केली. आणि काही दिवसांने जामीन दिला. संबंधित मुलीवर कलम 505 आणि 62 लावण्यात आलं होतं. मात्र या प्रकारावर प्रेस क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष मार्कंडेय काटजू यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पत्र लिहून या प्रकरणी पोलिसांच्या चौकशीची मागणी केली होती. काटूज यांच्या मागणीनंतर अनेक सामाजिक संस्थांनी अटकेच्या विरोधात निदर्शनं केली होती. अखेरीस या प्रकरणाची दखल घेऊन अधिक्षक रवींद्र सेनेगावकर आणि पालघर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांना निलंबित करण्यात आलं आहे. पालघर फेसबुक प्रकरणाचा घटनाक्रम- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर राज्यभरात स्वंघोषित बंद - पालघर येथील रहिवासी शाहिन धाडा तरूणीची फेसबुकवर बंद विरोधात कॉमेंट- या कॉमेंटमुळे संतप्त शिवसैनिकांनी केली शाहिनच्या नातेवाईकांच्या हॉस्पिटलची तोडफोड- शाहिन धाडा आणि तिची मैत्रीण रेणू श्रीनिवासनला अटक- प्रेस क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष मार्कंडेय काटजू यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र- फेसबुकवर कॉमेंट टाकली म्हणून अटक का ? सामाजिक संस्थांचा सवाल- शाहिन धाडा आणि रेणू श्रीनिवासनला प्रत्येकी 15 हजार रुपयांच्या जामिनावर सुटका - या प्रकरणी दोन अधिकारी निलंबित - अखेर शाहिन धाडा आणि रेणू श्रीनिवासनची आरोपातून मुक्तता

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 31, 2013 12:06 PM IST

अखेर शाहिन-रेणूची आरोपातून मुक्तता

31 जानेवारी

पालघर फेसबुक प्रकरणी अखेर शाहिन धाडा आणि रेणू श्रीनिवासन यांची आरोपातून मुक्तता करण्यात आली आहे. पालघर न्यायालयानेतक्रारदार भूषण संखेचा अर्ज फेटाळून लावला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर राज्यभरात स्वंघोषित बंद पुकारण्यात आला होता. मात्र पालघर येथील रहिवासी शाहिन धाडा या तरूणींने आपल्या फेसबुक अकाऊंटवर बंदविरोधात कॉमेंट पोस्ट केली होती. बाळासाहेब ठाकरेंसारखी लोकं रोज जन्मतात आणि मरतात मग यासाठी बंद करण्याची काय गरज आहे ? अशी कमेंट केली होती. तिच्या या कमेंटला तिच्या मैत्रिणीनं लाईक केलं. पण या कमेंटमुळे भडकलेल्या काही शिवसैनिकांनी मुलीच्या नातेवाईकाच्या हॉस्पिटलमध्ये दगडफेक केली. हॉस्पिटलमध्ये घुसून फर्निचर, उपकरणाची तोडफोड केली. यानंतर पोलिसांनी त्या मुलीलाच अटक केली. आणि काही दिवसांने जामीन दिला. संबंधित मुलीवर कलम 505 आणि 62 लावण्यात आलं होतं. मात्र या प्रकारावर प्रेस क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष मार्कंडेय काटजू यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पत्र लिहून या प्रकरणी पोलिसांच्या चौकशीची मागणी केली होती. काटूज यांच्या मागणीनंतर अनेक सामाजिक संस्थांनी अटकेच्या विरोधात निदर्शनं केली होती. अखेरीस या प्रकरणाची दखल घेऊन अधिक्षक रवींद्र सेनेगावकर आणि पालघर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांना निलंबित करण्यात आलं आहे.

पालघर फेसबुक प्रकरणाचा घटनाक्रम

- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर राज्यभरात स्वंघोषित बंद - पालघर येथील रहिवासी शाहिन धाडा तरूणीची फेसबुकवर बंद विरोधात कॉमेंट- या कॉमेंटमुळे संतप्त शिवसैनिकांनी केली शाहिनच्या नातेवाईकांच्या हॉस्पिटलची तोडफोड- शाहिन धाडा आणि तिची मैत्रीण रेणू श्रीनिवासनला अटक- प्रेस क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष मार्कंडेय काटजू यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र- फेसबुकवर कॉमेंट टाकली म्हणून अटक का ? सामाजिक संस्थांचा सवाल- शाहिन धाडा आणि रेणू श्रीनिवासनला प्रत्येकी 15 हजार रुपयांच्या जामिनावर सुटका - या प्रकरणी दोन अधिकारी निलंबित - अखेर शाहिन धाडा आणि रेणू श्रीनिवासनची आरोपातून मुक्तता

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 31, 2013 12:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close