S M L

बारामतीत पोलिसांकडून महिलांना मारहाण

17 जानेवारीदिल्लीत सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. मात्र केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या बारामतीत रक्षकच भक्षक झाल्याचं चित्र पाहायला मिळालंय. पोलीस स्टेशनमध्ये मद्यधुंद अवस्थेत पोलिसांनी ग्रामपंचायत सदस्यांसहित 4 महिलांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई राजेंद्र भापकर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पण भापकर दोनदिवसांपासून फरार असल्याचं कळतंय.बारामतीत सोमेश्वर भागातील एक प्रेमीयुगुल 8 दिवसांपूर्वी पळून गेलं. त्यानंतर मुलीच्या पालकांनी मुलगी हरवल्याची तक्रार करंजेपूल पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली होती. पोलीस शिपाई राजेंद्र भापकर यांनी मुलाच्या घरच्या आणि शेजारच्या महिलांनावर संशय घेऊन जबरदस्तीने पोलीस ठाण्यात नेलं. आणि दारूच्या नशेत पट्‌ट्यानं मारहाण केली असा आरोप या महिलांनी आरोप केलाय. त्यानंतर गुरुवारी सकाळी वडगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी पीएसआय पांढरे यांनी या महिलांची भेट घेऊन नेमकं त्या दिवशी काय घडलं होतं हे जाणून घेतलंय. या महिलांच्या तक्रारीनुसार पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान आरोपी पोलीस शिपाई राजेंद्र भापकर दोन दिवसांपासून गैरहजर असून अधिकार्‍यांचाही फोन उचलत नाहीये असं कळतंय. एकीकडे शरद पवार यांच्या कन्या सुप्रीया सुळे तरूणींसाठी राज्यभरात मेळावे घेत आहे पण त्यांच्या जन्मभूमीत महिलांनाच मारहाण झाल्याची घटना घडलीय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 17, 2013 02:29 PM IST

बारामतीत पोलिसांकडून महिलांना मारहाण

17 जानेवारी

दिल्लीत सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. मात्र केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या बारामतीत रक्षकच भक्षक झाल्याचं चित्र पाहायला मिळालंय. पोलीस स्टेशनमध्ये मद्यधुंद अवस्थेत पोलिसांनी ग्रामपंचायत सदस्यांसहित 4 महिलांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई राजेंद्र भापकर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पण भापकर दोनदिवसांपासून फरार असल्याचं कळतंय.

बारामतीत सोमेश्वर भागातील एक प्रेमीयुगुल 8 दिवसांपूर्वी पळून गेलं. त्यानंतर मुलीच्या पालकांनी मुलगी हरवल्याची तक्रार करंजेपूल पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली होती. पोलीस शिपाई राजेंद्र भापकर यांनी मुलाच्या घरच्या आणि शेजारच्या महिलांनावर संशय घेऊन जबरदस्तीने पोलीस ठाण्यात नेलं. आणि दारूच्या नशेत पट्‌ट्यानं मारहाण केली असा आरोप या महिलांनी आरोप केलाय. त्यानंतर गुरुवारी सकाळी वडगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी पीएसआय पांढरे यांनी या महिलांची भेट घेऊन नेमकं त्या दिवशी काय घडलं होतं हे जाणून घेतलंय. या महिलांच्या तक्रारीनुसार पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान आरोपी पोलीस शिपाई राजेंद्र भापकर दोन दिवसांपासून गैरहजर असून अधिकार्‍यांचाही फोन उचलत नाहीये असं कळतंय. एकीकडे शरद पवार यांच्या कन्या सुप्रीया सुळे तरूणींसाठी राज्यभरात मेळावे घेत आहे पण त्यांच्या जन्मभूमीत महिलांनाच मारहाण झाल्याची घटना घडलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 17, 2013 02:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close