S M L

'बजेटमध्ये पाण्यासाठी 25 टक्के विशेष निधी'

13 मार्चदुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पाण्याचं व्यवस्थापन करण्यासाठी आगामी बजेटमध्ये 25 टक्के विशेष निधीची तरतूद करणार अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत केली. दुष्काळी भागातले अपुरे सिंचन प्रकल्प, अपूर्ण पाणीपुरवठा योजना, भूजल पातळी वाढवणार्‍या योजना तातडीने पूर्ण करण्यासाठी येत्या बजेटमधला हा 25 टक्के निधी खर्च करण्यात येणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मागेल त्या गावाला किंवा वस्तीला टँकर तर 250 जनावरं असतील तिथं छावणी देण्यात येणार आहे. तसंच 105 सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी 2200 कोटी रुपयांचा प्रस्ताव आधीच पाठवण्यात आला आहे. त्याचबरोबर दुष्काळी भागात टँकरचे अधिकार तहसीलदाराला देण्यात आलेत. या भागात बोअरवेलसाठी भूजल प्राधिकरणाच्या परवानगीची गरज लागणार नाही. याशिवाय जुलै अखेरपर्यंत पाण्याचे व्यवस्थापन करण्यात येत असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 13, 2013 03:40 PM IST

'बजेटमध्ये पाण्यासाठी 25 टक्के विशेष निधी'

13 मार्च

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पाण्याचं व्यवस्थापन करण्यासाठी आगामी बजेटमध्ये 25 टक्के विशेष निधीची तरतूद करणार अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत केली. दुष्काळी भागातले अपुरे सिंचन प्रकल्प, अपूर्ण पाणीपुरवठा योजना, भूजल पातळी वाढवणार्‍या योजना तातडीने पूर्ण करण्यासाठी येत्या बजेटमधला हा 25 टक्के निधी खर्च करण्यात येणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मागेल त्या गावाला किंवा वस्तीला टँकर तर 250 जनावरं असतील तिथं छावणी देण्यात येणार आहे. तसंच 105 सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी 2200 कोटी रुपयांचा प्रस्ताव आधीच पाठवण्यात आला आहे. त्याचबरोबर दुष्काळी भागात टँकरचे अधिकार तहसीलदाराला देण्यात आलेत. या भागात बोअरवेलसाठी भूजल प्राधिकरणाच्या परवानगीची गरज लागणार नाही. याशिवाय जुलै अखेरपर्यंत पाण्याचे व्यवस्थापन करण्यात येत असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 13, 2013 03:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close