S M L

गारपीटीमुळे अमरावतीत पिकांचं मोठं नुकसान

25 फेब्रुवारीअर्धा महाराष्ट्र दुष्काळानं होरपळत असताना अमरावती जिल्ह्यात शेतकर्‍यांना गारपीटीने झोडपून काढले आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये अमरावती आणि परिसरात गारपीट आणि सोसाट्याच्या वार्‍यासह पाऊस झाला. यामुळे संत्रा, हरभरा आणि गव्हाच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय. संत्र्यांसाठी प्रसिध्द असलेल्या वरूड, मोर्शी तालुक्यात तर संत्रा उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. गारपिटीमुळे झाडाला लागलेल्या संत्र्यांचा सडाच खाली पडल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. झाडाला असलेल्या फळालाही मार लागल्यानं या मालाला भावही चांगला मिळणार नसल्याचं शेतकर्‍यांचं म्हणणं आहे. वर्षभराचं पीक हातचं गेल्यानं शेतकर्‍यांना नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी आता होत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 25, 2013 02:24 PM IST

गारपीटीमुळे अमरावतीत पिकांचं मोठं नुकसान

25 फेब्रुवारी

अर्धा महाराष्ट्र दुष्काळानं होरपळत असताना अमरावती जिल्ह्यात शेतकर्‍यांना गारपीटीने झोडपून काढले आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये अमरावती आणि परिसरात गारपीट आणि सोसाट्याच्या वार्‍यासह पाऊस झाला. यामुळे संत्रा, हरभरा आणि गव्हाच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय. संत्र्यांसाठी प्रसिध्द असलेल्या वरूड, मोर्शी तालुक्यात तर संत्रा उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. गारपिटीमुळे झाडाला लागलेल्या संत्र्यांचा सडाच खाली पडल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. झाडाला असलेल्या फळालाही मार लागल्यानं या मालाला भावही चांगला मिळणार नसल्याचं शेतकर्‍यांचं म्हणणं आहे. वर्षभराचं पीक हातचं गेल्यानं शेतकर्‍यांना नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी आता होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 25, 2013 02:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close