S M L

दुष्काळाचं राजकारण नको !

11 फेब्रुवारी 2013केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी आज मराठवाड्यात दुष्काळ आढावा बैठक घेतली. केंद्राची आणखी एक टीम राज्याचा दौरा करणार असून त्यानंतर केंद्राकडून आणखी मदत देण्यात येणार असल्याचं ते म्हणाले. दुष्काळाच्या प्रश्नावर सर्व मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र यावं असं आवाहनही शरद पवार यांनी केलं. दुष्काळ निवारणासाठी दीर्घ पल्ल्याच्या उपाययोजना कराव्या लागतील असंही ते म्हणाले. पवारांनी यावेळी सर्वपक्षीय बैठक घेऊन सर्वांशी चर्चा केली यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते,त्यांनीही यावेळी काही निर्णय जाहीर केले.अजित पवारांनी जाहीर केले निर्णयऔरंगाबादसाठी 9 कोटींच्या नव्या पाणीपुरवढा योजनेला मंजुरी 31 मार्चपर्यंत जालन्याला 11 कोटी 50 लाख देणारग्रामपंचायतींना चारा छावण्यांसाठी परवानगीफळबागांसाठी केंद्रकडून मदत आणणारराष्ट्रवादीचा मदतनिधीदुष्काळग्रस्त भागातल्या मुलांचं फीमुळे शिक्षण अपूर्ण राहु नये यासाठी राष्ट्रवादी मदत करणार आहेराष्ट्रवादीचे सर्व मंत्री खासदार,आमदार, जि.प. आणि पं.स.सदस्य आपलं एक महिन्याचं वेतन यासाठी देणार आहेत. त्यातून दुष्काळग्रस्त भागातल्या विद्यार्थ्यांना मदत करण्यात येईल.राज ठाकरेंची टीकादुष्काळी भागात केवळ दौरे केल्याने लोकांना पाणी मिळणार नाही, नेत्यांचे दौरे भंपक आहेत अशी टीका राज ठाकरे यांनी सांगलीत केली. दुष्काळी भागातल्या पाणी योजना पूर्ण करून जनतेची तहान भागवा असंही राज ठाकरे म्हणाले तर राज यांची टीका चूकीची असल्याचं खासदार वंदना चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 11, 2013 12:06 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 11, 2013 12:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close