S M L

विनयभंग प्रकरणी उपप्राचार्याला अटक

22 जानेवारी'शिक्षक हा समाजाचा आरसा असतो' असं नेहमी म्हटलं जात पण शिक्षकांच्या भूमिकेलाच काळीमा फासणारी घटना पुण्यात घडली. शाळेच्या उपप्राचार्यांनी विद्यार्थीनीचा विनयभंग करुन तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली इजू फ्रान्सिस यांना अटक करण्यात आली आहे. 2 जानेवारीला पीडित मुलीला इजू फ्रान्सिसने स्वतःच्या ऑफिसमध्ये बोलावले. आणि ऑफिसमध्ये तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर या घाबरलेल्या मुलीने बाहेर येऊन हा प्रकार मैत्रीणींना सांगितला. या प्रकरामुळे घाबरलेल्या पीडित तरूणींने शाळेत जाणंही बंद केलं होतं. पालकांनी तिला विचारल्यावर तिने कुटुंबीयांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर पालकांनी या प्रकाराची शाळेत चौकशी केली. शाळेमध्ये त्यांना दाद न मिळाल्याने या प्रकरणाची तक्रार त्यांनी येरवडा पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी शाळेसमोर निदर्शने केली. त्यानतंर इजू फ्रान्सिस यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी त्यांना 25 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 22, 2013 03:12 PM IST

विनयभंग प्रकरणी उपप्राचार्याला अटक

22 जानेवारी

'शिक्षक हा समाजाचा आरसा असतो' असं नेहमी म्हटलं जात पण शिक्षकांच्या भूमिकेलाच काळीमा फासणारी घटना पुण्यात घडली. शाळेच्या उपप्राचार्यांनी विद्यार्थीनीचा विनयभंग करुन तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली इजू फ्रान्सिस यांना अटक करण्यात आली आहे. 2 जानेवारीला पीडित मुलीला इजू फ्रान्सिसने स्वतःच्या ऑफिसमध्ये बोलावले. आणि ऑफिसमध्ये तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर या घाबरलेल्या मुलीने बाहेर येऊन हा प्रकार मैत्रीणींना सांगितला. या प्रकरामुळे घाबरलेल्या पीडित तरूणींने शाळेत जाणंही बंद केलं होतं. पालकांनी तिला विचारल्यावर तिने कुटुंबीयांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर पालकांनी या प्रकाराची शाळेत चौकशी केली. शाळेमध्ये त्यांना दाद न मिळाल्याने या प्रकरणाची तक्रार त्यांनी येरवडा पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी शाळेसमोर निदर्शने केली. त्यानतंर इजू फ्रान्सिस यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी त्यांना 25 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 22, 2013 03:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close