S M L

विठ्ठलाचे दागिने गहाळ प्रकरणी चौकशी समिती स्थापन

29 जानेवारीपंढरपूरच्या मंदिरातले विठ्ठलाचे काही ऐतिहासिक दागिने गहाळ झाल्याची बातमी आयबीएन लोकमतने दाखवली होती. या बातमीची घेऊन मंदिर समितीनं चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन केली आहे. बी.पी रोंगे, बाळासाहेब देहूकर आणि महावीर गांधी हे समितीचे सदस्य आहेत. ही समिती आठ दिवसांमध्ये अहवाल सादर करणार आहे. पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दागिन्यांच्या प्राचीन खजिना आहे. देवांचे सर्व अलंकार या खजिन्यात ठेवले जातात. या खजिन्यातील अलंकार गहाळ झाल्याचा अहवाल विधी आणि न्याय खात्याच्या तपासणी पथकानं दिलाय. जवळपास 88 हिरे, माणिक, मोती आणि सोन्याचे दागिने या खजिन्यातून गायब आहेत. एक वर्षापूर्वी दिलेला हा अहवाल मंदिर समितीनं गुडाळून ठेवला आहे. यात नेमकी काय गोम आहे, कोणाकोणाचा हाता आहे याचा शोध आता सुरू झाला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 29, 2013 12:04 PM IST

विठ्ठलाचे दागिने गहाळ प्रकरणी चौकशी समिती स्थापन

29 जानेवारी

पंढरपूरच्या मंदिरातले विठ्ठलाचे काही ऐतिहासिक दागिने गहाळ झाल्याची बातमी आयबीएन लोकमतने दाखवली होती. या बातमीची घेऊन मंदिर समितीनं चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन केली आहे. बी.पी रोंगे, बाळासाहेब देहूकर आणि महावीर गांधी हे समितीचे सदस्य आहेत. ही समिती आठ दिवसांमध्ये अहवाल सादर करणार आहे. पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दागिन्यांच्या प्राचीन खजिना आहे. देवांचे सर्व अलंकार या खजिन्यात ठेवले जातात. या खजिन्यातील अलंकार गहाळ झाल्याचा अहवाल विधी आणि न्याय खात्याच्या तपासणी पथकानं दिलाय. जवळपास 88 हिरे, माणिक, मोती आणि सोन्याचे दागिने या खजिन्यातून गायब आहेत. एक वर्षापूर्वी दिलेला हा अहवाल मंदिर समितीनं गुडाळून ठेवला आहे. यात नेमकी काय गोम आहे, कोणाकोणाचा हाता आहे याचा शोध आता सुरू झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 29, 2013 12:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close