S M L

'महापालिकांमध्ये जकात कराऐवजी एलबीटी लागू करा'

02 फेब्रुवारीराज्यातल्या महापालिकांमध्ये जकात करांऐवजी स्थानिक संस्था कर अर्थात एलबीटी लागू करावा, अशी शिफारस आभ्यास गटानं राज्य सरकारला केली आहे. सध्या राज्यातल्या काही महापालिकांध्ये एलबीटी आकारणी होतेय. आणि त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येतोय. ज्या प्रमाणे विक्रीकराऐवजी मुल्यवर्धीत कर म्हणजेच व्हॅट लागू करण्यात आला त्याचप्रमाणे एलबीटी हा टप्प्याटप्प्यावर आकारला जातो. त्यातून पारदर्शी पद्धतीने कर आकारला जाऊन तो वसूल होतो, असं अभ्यास गटाचं म्हणणं आहे. त्यामुळे वित्तविभागाच्या प्रधानसचिवांच्या या आभ्यासगटानं राज्यातल्या सर्व महापालिकांमध्ये एलबीटी आकारला जावा अशी शिफारस केलीय. या एलबीटी आकारणीला अनेकांचा विरोध आहे. तरीसुद्धा सर्व महापालिकांमध्ये याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्य सरकारनं आधीच घेतला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 2, 2013 04:11 PM IST

'महापालिकांमध्ये जकात कराऐवजी एलबीटी लागू करा'

02 फेब्रुवारी

राज्यातल्या महापालिकांमध्ये जकात करांऐवजी स्थानिक संस्था कर अर्थात एलबीटी लागू करावा, अशी शिफारस आभ्यास गटानं राज्य सरकारला केली आहे. सध्या राज्यातल्या काही महापालिकांध्ये एलबीटी आकारणी होतेय. आणि त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येतोय. ज्या प्रमाणे विक्रीकराऐवजी मुल्यवर्धीत कर म्हणजेच व्हॅट लागू करण्यात आला त्याचप्रमाणे एलबीटी हा टप्प्याटप्प्यावर आकारला जातो. त्यातून पारदर्शी पद्धतीने कर आकारला जाऊन तो वसूल होतो, असं अभ्यास गटाचं म्हणणं आहे. त्यामुळे वित्तविभागाच्या प्रधानसचिवांच्या या आभ्यासगटानं राज्यातल्या सर्व महापालिकांमध्ये एलबीटी आकारला जावा अशी शिफारस केलीय. या एलबीटी आकारणीला अनेकांचा विरोध आहे. तरीसुद्धा सर्व महापालिकांमध्ये याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्य सरकारनं आधीच घेतला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 2, 2013 04:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close