S M L

'विजयकुमार गावित यांच्या अवैध संपत्तीची चौकशी करा'

22 फेब्रुवारीवैद्यकीय शिक्षणमंत्री विजयकुमार गावित यांच्या अवैध संपत्तीची चौकशी करण्याची नोटीस कोर्टाने राज्यसरकारला बजावली आहे. मुंबई हायकोर्टात विष्णू मुसळे यांनी ही याचिका दाखल केली होती. ही याचिका आज न्या. ए. एम. खानविलकर आणि न्या. के. के. तातेड यांच्या बेंचपुढे आली. याचिकेची दखल घेऊन गावितांच्या अवैध संपत्तीची चौकशी करण्याची नोटीस राज्य सरकारला बजावली आहे. त्यामध्ये प्रधान सचिव, राज्याचे मुख्य सचिव, गृह विभागाचे प्रधान सचिव, अँटी करप्शनचे पोलीस महासंचालक आणि आर्थिक आणि गुन्हे शाखा तसेच इन्कम टॅक्सच्या प्रमुख अधिकार्‍यांना पार्टी करण्यात आलंय. आणि दोन आठवड्यात याबाबतचा अहवाल कोर्टापुढे सादर करण्यास सांगण्यात आलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 22, 2013 04:11 PM IST

'विजयकुमार गावित यांच्या अवैध संपत्तीची चौकशी करा'

22 फेब्रुवारी

वैद्यकीय शिक्षणमंत्री विजयकुमार गावित यांच्या अवैध संपत्तीची चौकशी करण्याची नोटीस कोर्टाने राज्यसरकारला बजावली आहे. मुंबई हायकोर्टात विष्णू मुसळे यांनी ही याचिका दाखल केली होती. ही याचिका आज न्या. ए. एम. खानविलकर आणि न्या. के. के. तातेड यांच्या बेंचपुढे आली. याचिकेची दखल घेऊन गावितांच्या अवैध संपत्तीची चौकशी करण्याची नोटीस राज्य सरकारला बजावली आहे. त्यामध्ये प्रधान सचिव, राज्याचे मुख्य सचिव, गृह विभागाचे प्रधान सचिव, अँटी करप्शनचे पोलीस महासंचालक आणि आर्थिक आणि गुन्हे शाखा तसेच इन्कम टॅक्सच्या प्रमुख अधिकार्‍यांना पार्टी करण्यात आलंय. आणि दोन आठवड्यात याबाबतचा अहवाल कोर्टापुढे सादर करण्यास सांगण्यात आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 22, 2013 04:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close