S M L

कलमाडींसह 10 जणांवर आरोप निश्चित

04 फेब्रुवारीकॉमनवेल्थ गेम्समधल्या घोटाळ्यासंदर्भात दिल्ली कोर्टात सुरेश कलमाडी आणि इतर 9 जणांवर आरोप निश्चित करण्यात आलेत. फसवणूक, गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचणे आणि पुरावे नष्ट करणे, असे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहे. टाईम मशीन खरेदीत झालेल्या या घोटाळ्याचा आयबीएन नेटवर्कनं सर्वात आधी पर्दाफाश केला होता. दरम्यान आरोप निश्चित झाले असले तरी त्यांना अटक होणार नाही.भारताची सर्वोच्च क्रीडा संस्था असलेल्या भारतीय ऑलम्पिक असोसिएशनचे एकेकाळी अध्यक्ष असलेले सुरेश कलमाडी यांच्या अडचणी आणखी वाढल्यायत. विशेष सीबीआय कोर्टानं कलमाडींविरोधात आरोप निश्चित केलेत. टाईमिंग आणि स्कोरिंग सिस्टीम उपकरणांची कंत्राटं नियमबाह्य पद्धतीने देण्यात आल्याचा आरोप कलमाडींवर ठेवण्यात आला आहे. यामुळे सरकारी तिजोरीचे 95 कोटींचे नुकसान झालं आहे. कलमाडी, त्यांचे सहकारी ललीत भानोत, व्हि. के. वर्मा आणि इतर 7 जणांवर आरोप ठेवण्यात आले आहे. - टेंडर प्रक्रियेत अडथळा आणणं आणि MSL स्पेन कंपनीला जाणिवपूर्वक डावलण्यात आल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. - स्विस टायमिंग कंपनीची निविदा 141 कोटींची होती. तर MSL स्पेन कंपनीची निविदा यापेक्षा खूपच कमी म्हणजे 46 कोटींची होती. असं असतानाही स्विस टायमिंग कंपनीलाच कंत्राट मिळालं. - या कंपनीनं 2008मध्ये झालेल्या यूथ कॉमनवेल्थ गेम्समध्ये नृत्य सादर करण्यासाठी शिल्पा शेट्टीला कलमाडींतर्फे 71 लाख रुपये दिले होते. त्याचवेळी या कटाला सुरुवात झाल्याचं सीबीआयचं म्हणणंय. याप्रकरणी 20 फेब्रुवारीपासून सुनावणी सुरू होणार आहे. कॉमनवेल्थ स्पर्धेत कलमाडींवर भ्रष्टाचाराचा आरोप झाल्यानंतर त्यांना काँग्रेसने पक्षातून निलंबित केलं. पण सर्व क्रीडा मंडळांवरूनही त्यांना बडतर्फ करावं,अशी विरोधकांची मागणी आहे. पण आपले सर्व निर्णय सरकारनं मंजूर केले आहेत. त्यामुळे सर्व आरोपांमधून आपली निर्दोष मुक्तता होईल, असा विश्वास कलमाडींना वाटतोय. त्यामुळे स्विस टायमिंग कंपनी आणि कलमाडी यांच्यात थेट व्यवहार झाल्याचं कोर्टासमोर सिद्ध करणं, हे सीबीआयपुढे मोठं आव्हान असणार आहे. महत्त्वाचे प्रश्न- आरोप निश्चित झाल्यावर ते सिद्ध होण्याची वाट न बघता कलमाडींनी स्वत:हून खासदारकी सोडावी का ?- स्वत:हून खासदारकी सोडली नाही, तर ती काढून घेण्यात यावी का ?- काँग्रेस त्यांना पक्षातून बडतर्फ करेल का ?- सुनावणी सुरू असेपर्यंत कलमाडींनी क्रीडा मंडळांच्या पदांवरून पायउतार व्हावं का ?- पदं सोडली तरी कलमाडी समर्थकांद्वारे क्रीडा मंडळं चालवतात का ?

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 4, 2013 09:49 AM IST

कलमाडींसह 10 जणांवर आरोप निश्चित

04 फेब्रुवारी

कॉमनवेल्थ गेम्समधल्या घोटाळ्यासंदर्भात दिल्ली कोर्टात सुरेश कलमाडी आणि इतर 9 जणांवर आरोप निश्चित करण्यात आलेत. फसवणूक, गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचणे आणि पुरावे नष्ट करणे, असे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहे. टाईम मशीन खरेदीत झालेल्या या घोटाळ्याचा आयबीएन नेटवर्कनं सर्वात आधी पर्दाफाश केला होता. दरम्यान आरोप निश्चित झाले असले तरी त्यांना अटक होणार नाही.

भारताची सर्वोच्च क्रीडा संस्था असलेल्या भारतीय ऑलम्पिक असोसिएशनचे एकेकाळी अध्यक्ष असलेले सुरेश कलमाडी यांच्या अडचणी आणखी वाढल्यायत. विशेष सीबीआय कोर्टानं कलमाडींविरोधात आरोप निश्चित केलेत. टाईमिंग आणि स्कोरिंग सिस्टीम उपकरणांची कंत्राटं नियमबाह्य पद्धतीने देण्यात आल्याचा आरोप कलमाडींवर ठेवण्यात आला आहे. यामुळे सरकारी तिजोरीचे 95 कोटींचे नुकसान झालं आहे. कलमाडी, त्यांचे सहकारी ललीत भानोत, व्हि. के. वर्मा आणि इतर 7 जणांवर आरोप ठेवण्यात आले आहे.

- टेंडर प्रक्रियेत अडथळा आणणं आणि MSL स्पेन कंपनीला जाणिवपूर्वक डावलण्यात आल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. - स्विस टायमिंग कंपनीची निविदा 141 कोटींची होती. तर MSL स्पेन कंपनीची निविदा यापेक्षा खूपच कमी म्हणजे 46 कोटींची होती. असं असतानाही स्विस टायमिंग कंपनीलाच कंत्राट मिळालं. - या कंपनीनं 2008मध्ये झालेल्या यूथ कॉमनवेल्थ गेम्समध्ये नृत्य सादर करण्यासाठी शिल्पा शेट्टीला कलमाडींतर्फे 71 लाख रुपये दिले होते. त्याचवेळी या कटाला सुरुवात झाल्याचं सीबीआयचं म्हणणंय.

याप्रकरणी 20 फेब्रुवारीपासून सुनावणी सुरू होणार आहे. कॉमनवेल्थ स्पर्धेत कलमाडींवर भ्रष्टाचाराचा आरोप झाल्यानंतर त्यांना काँग्रेसने पक्षातून निलंबित केलं. पण सर्व क्रीडा मंडळांवरूनही त्यांना बडतर्फ करावं,अशी विरोधकांची मागणी आहे.

पण आपले सर्व निर्णय सरकारनं मंजूर केले आहेत. त्यामुळे सर्व आरोपांमधून आपली निर्दोष मुक्तता होईल, असा विश्वास कलमाडींना वाटतोय. त्यामुळे स्विस टायमिंग कंपनी आणि कलमाडी यांच्यात थेट व्यवहार झाल्याचं कोर्टासमोर सिद्ध करणं, हे सीबीआयपुढे मोठं आव्हान असणार आहे.

महत्त्वाचे प्रश्न- आरोप निश्चित झाल्यावर ते सिद्ध होण्याची वाट न बघता कलमाडींनी स्वत:हून खासदारकी सोडावी का ?- स्वत:हून खासदारकी सोडली नाही, तर ती काढून घेण्यात यावी का ?- काँग्रेस त्यांना पक्षातून बडतर्फ करेल का ?- सुनावणी सुरू असेपर्यंत कलमाडींनी क्रीडा मंडळांच्या पदांवरून पायउतार व्हावं का ?- पदं सोडली तरी कलमाडी समर्थकांद्वारे क्रीडा मंडळं चालवतात का ?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 4, 2013 09:49 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close