S M L

पहिल्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलिया 6 विकेटवर 316 रन्स

22 फेब्रुवारीभारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानच्या पहिल्या टेस्ट मॅचला आजपासून चेन्नईमध्ये सुरुवात झाली. मॅचच्या पहिल्याच दिवसाचे हिरो ठरले ते भारताचा आर अश्विन आणि ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन मायकेल क्लार्क. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून पहिली बॅटिंग घेतली. पण त्यांची सुरुवात खराब झाली. अश्विननं कोवान आणि ह्युजेसला आऊट करत ऑस्ट्रेलियाला धक्का दिला. तर शेन वॉट्सनलाही अश्विननं पॅव्हेलिअनचा रस्ता दाखवला. पण सुरुवातीला झटपट विकेट घेतल्यानंतरही भारतीय बॉलर्सना ऑस्ट्रेलियाची इनिंग गुंडाळण्यात अपयश आलं. डेव्हिड वॉर्नर, कॅप्टन मायकेल क्लार्क आणि टेस्ट पदार्पण करणार्‍या मोझेस हेन्रिक्सनं दमदार बॅटिंग करत टीमला पहिल्या दिवसअखेर तीनशे रन्सचा टप्पा गाठून दिला. मायकेल क्लार्कनं नॉटआऊट सेंच्युरी ठोकली. तर वॉर्नर आणि हेन्रिक्सनं हाफसेंच्युरी झळकावल्या. पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने 7 विकेट गमावत 316 असा समाधानकारक स्कोर उभा केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 22, 2013 04:55 PM IST

पहिल्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलिया 6 विकेटवर 316 रन्स

22 फेब्रुवारी

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानच्या पहिल्या टेस्ट मॅचला आजपासून चेन्नईमध्ये सुरुवात झाली. मॅचच्या पहिल्याच दिवसाचे हिरो ठरले ते भारताचा आर अश्विन आणि ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन मायकेल क्लार्क. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून पहिली बॅटिंग घेतली. पण त्यांची सुरुवात खराब झाली. अश्विननं कोवान आणि ह्युजेसला आऊट करत ऑस्ट्रेलियाला धक्का दिला. तर शेन वॉट्सनलाही अश्विननं पॅव्हेलिअनचा रस्ता दाखवला. पण सुरुवातीला झटपट विकेट घेतल्यानंतरही भारतीय बॉलर्सना ऑस्ट्रेलियाची इनिंग गुंडाळण्यात अपयश आलं. डेव्हिड वॉर्नर, कॅप्टन मायकेल क्लार्क आणि टेस्ट पदार्पण करणार्‍या मोझेस हेन्रिक्सनं दमदार बॅटिंग करत टीमला पहिल्या दिवसअखेर तीनशे रन्सचा टप्पा गाठून दिला. मायकेल क्लार्कनं नॉटआऊट सेंच्युरी ठोकली. तर वॉर्नर आणि हेन्रिक्सनं हाफसेंच्युरी झळकावल्या. पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने 7 विकेट गमावत 316 असा समाधानकारक स्कोर उभा केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 22, 2013 04:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close