S M L

नागपूर बँक लुटी प्रकरणात पोलीस काँस्टेबलचा हात

11 मार्चनागपूर : शहरात घडलेल्या ऍक्सिस बँकेच्या 2 कोटी 36 लाख रुपयांच्या लुटीच्या घटनेमध्ये एका पोलीस काँस्टेबलचा सहभाग असल्याचा तपासात पुढे आलंय. नागपूर पोलीस मुख्यालयात नेमणुकीत असलेला शैलेष मसराम याला या प्रकरणात गिट्टीखदान पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. आता पर्यंत या प्रकरणात सहा जणांना अटक करण्यात आली आहे. शेलेष मसराम आणि त्याच्या साथीदाराकडून 40 लाख रुपयेही जप्त करण्यात आले आहे. गुरूवारी 7 मार्च रोजी दुपारी 3 च्या सुमारास नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 वर ठाणेगाव कारंजा जवळ ही घटना घडली होती. 2 कोटी 36 लाखांची रोकड घेऊन निघालेल्या व्हॅनवर सशस्त्र हल्ला चढवण्यात आला. यावेळी या व्हॅनमध्ये बंदूकधारी सुरक्षारक्षक होते मात्र त्यांना बंदूकीचा धाक दाखवून पैसे लुटण्यात आले. हे सुरक्षारक्षकही या लुटीत सहभागी होते. त्यांनी मारहाणीचे नाटकही रचन्यात आले होते. ही लूट पुर्वनियोजित होती हे पोलीस तपासातून उघड झाली. एखाद्या सिनेमाला शोभावा असा लुटीचा प्रकार काही दिवसांतच उघड करण्यास नागपूर पोलिसांना यश आलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 11, 2013 03:11 PM IST

नागपूर बँक लुटी प्रकरणात पोलीस काँस्टेबलचा हात

11 मार्च

नागपूर : शहरात घडलेल्या ऍक्सिस बँकेच्या 2 कोटी 36 लाख रुपयांच्या लुटीच्या घटनेमध्ये एका पोलीस काँस्टेबलचा सहभाग असल्याचा तपासात पुढे आलंय. नागपूर पोलीस मुख्यालयात नेमणुकीत असलेला शैलेष मसराम याला या प्रकरणात गिट्टीखदान पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. आता पर्यंत या प्रकरणात सहा जणांना अटक करण्यात आली आहे. शेलेष मसराम आणि त्याच्या साथीदाराकडून 40 लाख रुपयेही जप्त करण्यात आले आहे. गुरूवारी 7 मार्च रोजी दुपारी 3 च्या सुमारास नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 वर ठाणेगाव कारंजा जवळ ही घटना घडली होती. 2 कोटी 36 लाखांची रोकड घेऊन निघालेल्या व्हॅनवर सशस्त्र हल्ला चढवण्यात आला. यावेळी या व्हॅनमध्ये बंदूकधारी सुरक्षारक्षक होते मात्र त्यांना बंदूकीचा धाक दाखवून पैसे लुटण्यात आले. हे सुरक्षारक्षकही या लुटीत सहभागी होते. त्यांनी मारहाणीचे नाटकही रचन्यात आले होते. ही लूट पुर्वनियोजित होती हे पोलीस तपासातून उघड झाली. एखाद्या सिनेमाला शोभावा असा लुटीचा प्रकार काही दिवसांतच उघड करण्यास नागपूर पोलिसांना यश आलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 11, 2013 03:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close