S M L

आरोग्य यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे कुपोषणाचे दोन बळी

04 फेब्रुवारीएकीकडे कुपोषण निर्मुलनासाठी कोट्यावधी रुपये खर्च होत असताना, दुसरीकडे आरोग्य यंत्रणेच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे नंदुरबार जिल्ह्यातले बालमृत्यू सुरूच आहेत. अक्कलकुवा तालुक्यात गेल्या महिनाभरात दोन कुपोषित मुलांचा मृत्यू झाला आहे. रोजकुंड गावातला विक्रम वसावे हा आरोग्य यंत्रणेच्या हलगर्जीपणाचा बळी पडला आहे. विक्रमवरअक्कलकुवा रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्याची तब्येत बिघडल्यावर त्याला नंदुरबारच्या शासकीय रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. पण, नियमाप्रमाणे त्यासाठी वाहनाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली नाही. शेवटी विक्रमची आई डोंगर्‍याबाई त्याला घरी घेऊन जात असताना वाटेत त्याचा मृत्यू झाला. यावरही कहर म्हणजे, असा मुलगा आपल्याकडे दाखलच नसल्याचं अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयाचं म्हणणं आहे. पण, विक्रमला शासकीय रूग्णालयात दाखल केल्याची नोंद विक्रमच्या आईला देण्यात आलेल्या पावतीवर आहे. त्यामुळे सरकारी यंत्रणेनं मदत तर केलीच नाही उलट या प्रकरणातून पळवाट शोधण्याचा प्रयत्न केलाय.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 4, 2013 10:01 AM IST

आरोग्य यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे कुपोषणाचे दोन बळी

04 फेब्रुवारी

एकीकडे कुपोषण निर्मुलनासाठी कोट्यावधी रुपये खर्च होत असताना, दुसरीकडे आरोग्य यंत्रणेच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे नंदुरबार जिल्ह्यातले बालमृत्यू सुरूच आहेत. अक्कलकुवा तालुक्यात गेल्या महिनाभरात दोन कुपोषित मुलांचा मृत्यू झाला आहे. रोजकुंड गावातला विक्रम वसावे हा आरोग्य यंत्रणेच्या हलगर्जीपणाचा बळी पडला आहे. विक्रमवरअक्कलकुवा रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्याची तब्येत बिघडल्यावर त्याला नंदुरबारच्या शासकीय रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. पण, नियमाप्रमाणे त्यासाठी वाहनाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली नाही. शेवटी विक्रमची आई डोंगर्‍याबाई त्याला घरी घेऊन जात असताना वाटेत त्याचा मृत्यू झाला. यावरही कहर म्हणजे, असा मुलगा आपल्याकडे दाखलच नसल्याचं अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयाचं म्हणणं आहे. पण, विक्रमला शासकीय रूग्णालयात दाखल केल्याची नोंद विक्रमच्या आईला देण्यात आलेल्या पावतीवर आहे. त्यामुळे सरकारी यंत्रणेनं मदत तर केलीच नाही उलट या प्रकरणातून पळवाट शोधण्याचा प्रयत्न केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 4, 2013 10:01 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close