S M L

डेव्हिड हेडलीला 35 वर्षांचा कारावास

25 जानेवारीमुंबई हल्ल्याप्रकरणी लष्कर-ए-तोयबाचा अतिरेकी डेव्हिड हेडलीला अमेरिकेतल्या शिकागो कोर्टानं 35 वर्षांची शिक्षा ठोठावलीय. या केसमध्ये हेडलीनं तपासात सहकार्य केल्यानं त्याची शिक्षा कमी करावी अशी मागणी अमेरिकन सरकारनं कोर्टात केली होती. ही शिक्षा अपुरी असल्याचं म्हणत भारतानं यावर नाराजी व्यक्त केलीय. हेडलीची शिक्षा आणि त्याचा 26/11 च्या खटल्यावर कसा परिणाम होऊ शकतो.लष्कर-ए-तोयबाचा अतिरेकी डेव्हिड हेडली कधी काळी अमेरिकेन तुरुंगातून बाहेर आलाच तर तेव्हा तो 87 वर्षांचा असेल...त्याला 35 वर्षांची शिक्षा झालीय. पण या शिक्षेवर भारतानं नाराजी व्यक्त केलीय. भारतात खटला चालला असता तर हेडलीला फाशीची शिक्षा मिळाली असती, असं भारत सरकारनं म्हटलंय. हेडलीला भारताच्या ताब्यात द्यायला अमेरिकेनं नकार दिलाय. पण, 26/11 प्रकरणी हेडलीनं दिलेला जबाब 26/11 हल्ल्याच्या केसमध्ये NIA ला उपयोगी ठरणार आहे. चार्जशीटमध्ये हेडलीसोबत तहव्वूर राणा, हाफीज सईद, तसंच पाकिस्तानच्या चार निवृत्त आणि सेवेत असलेल्या एका लष्करी अधिकार्‍याचा समावेश आहे.येत्या काळात - NIA हेडलीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्याची मागणी करेल- तसंच तहव्वुर राणा, हेडलीची पत्नी आणि मैत्रिणीच्या चौकशीची परवानगी मागण्याची शक्यता आहेहेडली हा अमेरिकेचा खबर्‍या होता. 2009 मध्ये त्याला अटक झाली. तोपर्यंत तो खबर्‍या आणि अतिरेकी अशा दुहेरी भूमिकेत वावरत होता. रेकीसाठी अनेकवेळा मुंबईत येऊनही तब्बल 7 वर्षं तो भारतीय यंत्रणांच्या रडारबाहेर कसा राहिला याचं अनेकांना आश्चर्य वाटतंय. अमेरिकेने सरकारने हेडलीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला का तसंच स्वतःच्या फायद्यासाठी आयएसआयबाबत मवाळ भूमिका घेतली का, हासुद्धा एक प्रश्न आहे.अमेरिका दुटप्पी?- हेडलीच्या दहशतवादी कृत्यांबद्दल खासकरून 26/11 च्या कटाबद्दल अमेरिकेला माहिती होती का ?- माहिती असूनही अमेरिका भारताला सावध करू शकली नाही का ?- मुंबई हल्ल्यानंतर हेडलीच्या प्रवासाबद्दल अमेरिकेनं भारताला का माहिती दिली नाही ?- हेडलीच्या चौकशीसाठी 2010 पासून भारत करत असलेल्या विनंतीला अमेरिकेनं का प्रतिसाद दिला नाही ?- 26/11च्या पाकिस्तानी सूत्रधारांना भारताच्या ताब्यात देण्यासाठी अमेरिकेनं दबाव का टाकला नाही ?दरम्यान, दहशतवादाच्या मुद्द्यावर भारतासाठी पाकिस्तानचं आव्हान कायम आहे. 26/11 च्या पाकिस्तानातल्या खटल्यात काहीच प्रगती झाली नाहीय. तसंच हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफीज सईदवरही कोणतीच कारवाई झालेली नाहीय. हेडली हा भारताचाच एजंट होता, असं वक्तव्य पाकिस्तानचे गृहमंत्री रेहमान मलीक यांनी नुकतंच केलं होतं. या विधानावरूनच मुंबई हल्ल्यातल्या 166 बळींना न्याय देण्याचं आव्हान भारतासाठी किती कठीण आहे हे स्पष्ट होतंय.न्यायाधीश म्हणाले...'हेडली हा दहशतवादी आहे. त्यानं गुन्हा केला, तपासात सहकार्य केलं आणि नंतर सहकार्याचा फायदाही मिळवला. मी आता बदललोय असं जेव्हा हेडली म्हणाला, तेव्हा माझा त्याच्यावर अजिबात विश्वास बसला नाही. हेडलीपासून लोकांचं संरक्षण करणं आणि तो अशा कृत्यांमध्ये पुन्हा भाग घेणार नाही हे पाहणं, हे माझं कर्तव्य आहे.' अमेरिकेची प्रतिक्रिया'हेडलीनं अमेरिका आणि भारतीय अधिकार्‍यांना चौकशीसाठी सहकार्य केलं. त्यामुळेच त्याला फाशीची शिक्षा नको, अशी मागणी करण्याचा निर्णय अमेरिकेच्या विधी आणि न्याय विभागानं घेतला. हेडलीला झालेली 35 वर्षांची शिक्षा म्हणजे 26/11 हल्ल्यातल्या दोषींना शिक्षा देण्याबाबत एक पुढचं पाऊल आहे. लष्कर-ए-तोयबाबद्दल हेडलीनं खूप महत्त्वाची माहिती दिलीय. दहशतवादाचा सामना करण्यासाठी भारत-अमेरिकेतलं सहकार्य आता आणखी दृढ झालंय.'26/11 हल्ल्यात हेडलीची भूमिका- हल्ल्यापूर्वी आणि हल्ल्यानंतर मुंबईला अनेक वेळा भेट- हल्ल्याचे ठिकाण शोधण्यासाठी भारताचा 5 वेळा प्रवास- प्रत्येक प्रवासात व्हिडिओ फुटेज आणि जीपीएस डेटा जमवला- व्हिडिओ फुटेजमध्ये संभाव्य टार्गेटचं चित्रण केलं- ताजमहाल आणि ओबेरॉय ट्रायडंट हॉटेलमध्ये वास्तव्ययासाठी हेडली दोषी- भारतात सार्वजनिक ठिकाणी बॉम्ब ठेवण्याचा कट आखणं- भारतातल्या लोकांची हत्या करणं आणि अपंग बनवणं- भारतात 6 अमेरिकन लोकांची हत्या करण्यासाठी मदत करणं- भारतात दहशतवादी कारवायांसाठी मदत करणं- डेन्मार्कमधल्या लोकांची हत्या करणं आणि अपंग बनवणं- डेन्मार्कमध्ये दहशतवादी कारवायांसाठी मदत करणं- लष्कर-ए-तोयबाला मदत करणं

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 25, 2013 10:03 AM IST

डेव्हिड हेडलीला 35 वर्षांचा कारावास

25 जानेवारी

मुंबई हल्ल्याप्रकरणी लष्कर-ए-तोयबाचा अतिरेकी डेव्हिड हेडलीला अमेरिकेतल्या शिकागो कोर्टानं 35 वर्षांची शिक्षा ठोठावलीय. या केसमध्ये हेडलीनं तपासात सहकार्य केल्यानं त्याची शिक्षा कमी करावी अशी मागणी अमेरिकन सरकारनं कोर्टात केली होती. ही शिक्षा अपुरी असल्याचं म्हणत भारतानं यावर नाराजी व्यक्त केलीय. हेडलीची शिक्षा आणि त्याचा 26/11 च्या खटल्यावर कसा परिणाम होऊ शकतो.

लष्कर-ए-तोयबाचा अतिरेकी डेव्हिड हेडली कधी काळी अमेरिकेन तुरुंगातून बाहेर आलाच तर तेव्हा तो 87 वर्षांचा असेल...त्याला 35 वर्षांची शिक्षा झालीय. पण या शिक्षेवर भारतानं नाराजी व्यक्त केलीय. भारतात खटला चालला असता तर हेडलीला फाशीची शिक्षा मिळाली असती, असं भारत सरकारनं म्हटलंय. हेडलीला भारताच्या ताब्यात द्यायला अमेरिकेनं नकार दिलाय. पण, 26/11 प्रकरणी हेडलीनं दिलेला जबाब 26/11 हल्ल्याच्या केसमध्ये NIA ला उपयोगी ठरणार आहे. चार्जशीटमध्ये हेडलीसोबत तहव्वूर राणा, हाफीज सईद, तसंच पाकिस्तानच्या चार निवृत्त आणि सेवेत असलेल्या एका लष्करी अधिकार्‍याचा समावेश आहे.

येत्या काळात - NIA हेडलीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्याची मागणी करेल- तसंच तहव्वुर राणा, हेडलीची पत्नी आणि मैत्रिणीच्या चौकशीची परवानगी मागण्याची शक्यता आहे

हेडली हा अमेरिकेचा खबर्‍या होता. 2009 मध्ये त्याला अटक झाली. तोपर्यंत तो खबर्‍या आणि अतिरेकी अशा दुहेरी भूमिकेत वावरत होता. रेकीसाठी अनेकवेळा मुंबईत येऊनही तब्बल 7 वर्षं तो भारतीय यंत्रणांच्या रडारबाहेर कसा राहिला याचं अनेकांना आश्चर्य वाटतंय. अमेरिकेने सरकारने हेडलीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला का तसंच स्वतःच्या फायद्यासाठी आयएसआयबाबत मवाळ भूमिका घेतली का, हासुद्धा एक प्रश्न आहे.

अमेरिका दुटप्पी?- हेडलीच्या दहशतवादी कृत्यांबद्दल खासकरून 26/11 च्या कटाबद्दल अमेरिकेला माहिती होती का ?- माहिती असूनही अमेरिका भारताला सावध करू शकली नाही का ?- मुंबई हल्ल्यानंतर हेडलीच्या प्रवासाबद्दल अमेरिकेनं भारताला का माहिती दिली नाही ?- हेडलीच्या चौकशीसाठी 2010 पासून भारत करत असलेल्या विनंतीला अमेरिकेनं का प्रतिसाद दिला नाही ?- 26/11च्या पाकिस्तानी सूत्रधारांना भारताच्या ताब्यात देण्यासाठी अमेरिकेनं दबाव का टाकला नाही ?दरम्यान, दहशतवादाच्या मुद्द्यावर भारतासाठी पाकिस्तानचं आव्हान कायम आहे. 26/11 च्या पाकिस्तानातल्या खटल्यात काहीच प्रगती झाली नाहीय. तसंच हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफीज सईदवरही कोणतीच कारवाई झालेली नाहीय. हेडली हा भारताचाच एजंट होता, असं वक्तव्य पाकिस्तानचे गृहमंत्री रेहमान मलीक यांनी नुकतंच केलं होतं. या विधानावरूनच मुंबई हल्ल्यातल्या 166 बळींना न्याय देण्याचं आव्हान भारतासाठी किती कठीण आहे हे स्पष्ट होतंय.

न्यायाधीश म्हणाले...'हेडली हा दहशतवादी आहे. त्यानं गुन्हा केला, तपासात सहकार्य केलं आणि नंतर सहकार्याचा फायदाही मिळवला. मी आता बदललोय असं जेव्हा हेडली म्हणाला, तेव्हा माझा त्याच्यावर अजिबात विश्वास बसला नाही. हेडलीपासून लोकांचं संरक्षण करणं आणि तो अशा कृत्यांमध्ये पुन्हा भाग घेणार नाही हे पाहणं, हे माझं कर्तव्य आहे.' अमेरिकेची प्रतिक्रिया'हेडलीनं अमेरिका आणि भारतीय अधिकार्‍यांना चौकशीसाठी सहकार्य केलं. त्यामुळेच त्याला फाशीची शिक्षा नको, अशी मागणी करण्याचा निर्णय अमेरिकेच्या विधी आणि न्याय विभागानं घेतला. हेडलीला झालेली 35 वर्षांची शिक्षा म्हणजे 26/11 हल्ल्यातल्या दोषींना शिक्षा देण्याबाबत एक पुढचं पाऊल आहे. लष्कर-ए-तोयबाबद्दल हेडलीनं खूप महत्त्वाची माहिती दिलीय. दहशतवादाचा सामना करण्यासाठी भारत-अमेरिकेतलं सहकार्य आता आणखी दृढ झालंय.'26/11 हल्ल्यात हेडलीची भूमिका- हल्ल्यापूर्वी आणि हल्ल्यानंतर मुंबईला अनेक वेळा भेट- हल्ल्याचे ठिकाण शोधण्यासाठी भारताचा 5 वेळा प्रवास- प्रत्येक प्रवासात व्हिडिओ फुटेज आणि जीपीएस डेटा जमवला- व्हिडिओ फुटेजमध्ये संभाव्य टार्गेटचं चित्रण केलं- ताजमहाल आणि ओबेरॉय ट्रायडंट हॉटेलमध्ये वास्तव्य

यासाठी हेडली दोषी- भारतात सार्वजनिक ठिकाणी बॉम्ब ठेवण्याचा कट आखणं- भारतातल्या लोकांची हत्या करणं आणि अपंग बनवणं- भारतात 6 अमेरिकन लोकांची हत्या करण्यासाठी मदत करणं- भारतात दहशतवादी कारवायांसाठी मदत करणं- डेन्मार्कमधल्या लोकांची हत्या करणं आणि अपंग बनवणं- डेन्मार्कमध्ये दहशतवादी कारवायांसाठी मदत करणं- लष्कर-ए-तोयबाला मदत करणं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 25, 2013 10:03 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close