S M L

गरवारे बालभवन पुन्हा संकटात

08 मार्चपुणे : गरवारे बालभवनची जागा पुन्हा एकदा संकटात आलीय. महापालिका आयुक्तांच्या अभिप्रायामुळे ही जागा पुन्हा एकदा बिल्डरांच्या घशात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गरवारे बालभवन चालवणार्‍या ओम चॅरिटेबल ट्रस्टला करारवाढ द्यायला नकार देण्यात आलाय. यापुढे बालभवन चालवायचं असेल तर त्यांना रीतसर टेंडर प्रक्रियेत भाग घ्यावा लागणार आहे. महापालिका प्रशासनाने स्थायी समितीसमोर हे स्पष्ट केलंय. महत्वाचं म्हणजे महापालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. स्थायी समितीचे अध्यक्षपदही राष्ट्रवादीकडेच आहे. राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष वंदना चव्हाण यांनी मुलांसाठीचं बालभवन हे खेळायसाठीच राहिलं पाहिजे अशी भूमिका घेत आयुक्तांना पत्रही लिहिलं आहे.. पण महापालिकेतले राष्ट्रवादीचे नेते मात्र अजूनही याबाबत ठाम भूमिका घ्यायला तयार नाहीत. काही दिवसांपूर्वी बालभवनच्या जागेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या व्यंगचित्र दालनाचा प्रस्ताव आला होता. आयबीएन लोकमतच्या पाठपुराव्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला. पण आता पुन्हा एकदा बालभवनवर संकट उभं राहिलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 8, 2013 10:21 AM IST

गरवारे बालभवन पुन्हा संकटात

08 मार्च

पुणे : गरवारे बालभवनची जागा पुन्हा एकदा संकटात आलीय. महापालिका आयुक्तांच्या अभिप्रायामुळे ही जागा पुन्हा एकदा बिल्डरांच्या घशात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गरवारे बालभवन चालवणार्‍या ओम चॅरिटेबल ट्रस्टला करारवाढ द्यायला नकार देण्यात आलाय. यापुढे बालभवन चालवायचं असेल तर त्यांना रीतसर टेंडर प्रक्रियेत भाग घ्यावा लागणार आहे. महापालिका प्रशासनाने स्थायी समितीसमोर हे स्पष्ट केलंय. महत्वाचं म्हणजे महापालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. स्थायी समितीचे अध्यक्षपदही राष्ट्रवादीकडेच आहे. राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष वंदना चव्हाण यांनी मुलांसाठीचं बालभवन हे खेळायसाठीच राहिलं पाहिजे अशी भूमिका घेत आयुक्तांना पत्रही लिहिलं आहे.. पण महापालिकेतले राष्ट्रवादीचे नेते मात्र अजूनही याबाबत ठाम भूमिका घ्यायला तयार नाहीत. काही दिवसांपूर्वी बालभवनच्या जागेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या व्यंगचित्र दालनाचा प्रस्ताव आला होता. आयबीएन लोकमतच्या पाठपुराव्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला. पण आता पुन्हा एकदा बालभवनवर संकट उभं राहिलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 8, 2013 10:21 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close