S M L

मोनोरेल लवकरच धावणार !

17 फेब्रुवारी 2013मुंबई - मुंबईकरांसाठी खूशखबर आहे. मुंबईच्या ट्रॅफिकवरील ताण कमी करण्यासाठी महत्त्वाच्या ठरणा•या मोनोरेलची शनिवारी यशस्वी चाचणी झाली. वडाळा ते चेंबूर अशा 9 किलोमीटरच्या पहिल्या टप्प्यात ही चाचणी घेण्यात आली. भारतातली ही पहिली मोनोरेल आहे. यावर्षीच्या ऑगस्ट महिन्यापर्यंत ती मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. या मोनोरेलच्या सर्व चाचण्या पूर्ण झाल्या असून आज शेवटची चाचणी घेण्यात आली. यावेळी पहिल्यांदा मोनोरेल आतून कशी आहे हे मीडियाला दाखवण्यात आलं. तसेच मोनोरेलचा प्रवासही घडवण्यात आला. यामुळं वाहतूकीवरचा ताण थोडा कमी होण्याची शक्यता आहे.मोनोरेलची वैशिष्टे• जगातली दुसरी लांब मोनोरेल• मुंबईला पूर्व-पश्चिम असं जोडलं जाईल• मनोरोलचे सर्व कोच एसी• गुलाबी,हिरवा आणि निळ्या रंगाच्या कोच• व्दिस्तरीय सुरक्षा व्यवस्था• कार्ड पंचिगनंतरच स्टेशनमध्ये प्रवेश

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 17, 2013 11:43 AM IST

मोनोरेल लवकरच धावणार !

17 फेब्रुवारी 2013मुंबई - मुंबईकरांसाठी खूशखबर आहे. मुंबईच्या ट्रॅफिकवरील ताण कमी करण्यासाठी महत्त्वाच्या ठरणा•या मोनोरेलची शनिवारी यशस्वी चाचणी झाली. वडाळा ते चेंबूर अशा 9 किलोमीटरच्या पहिल्या टप्प्यात ही चाचणी घेण्यात आली. भारतातली ही पहिली मोनोरेल आहे. यावर्षीच्या ऑगस्ट महिन्यापर्यंत ती मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. या मोनोरेलच्या सर्व चाचण्या पूर्ण झाल्या असून आज शेवटची चाचणी घेण्यात आली. यावेळी पहिल्यांदा मोनोरेल आतून कशी आहे हे मीडियाला दाखवण्यात आलं. तसेच मोनोरेलचा प्रवासही घडवण्यात आला. यामुळं वाहतूकीवरचा ताण थोडा कमी होण्याची शक्यता आहे.

मोनोरेलची वैशिष्टे

• जगातली दुसरी लांब मोनोरेल• मुंबईला पूर्व-पश्चिम असं जोडलं जाईल• मनोरोलचे सर्व कोच एसी• गुलाबी,हिरवा आणि निळ्या रंगाच्या कोच• व्दिस्तरीय सुरक्षा व्यवस्था• कार्ड पंचिगनंतरच स्टेशनमध्ये प्रवेश

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 17, 2013 11:43 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close