S M L

'गुंडाला ताब्यात द्या', जमावाची कोर्टाच्या परिसरात दगडफेक

04 मार्चनागपूरमध्ये जिल्हा न्यायालय परिसरात संतप्त जमावानं जोरदार दगडफेक केली. कुख्यात गुंड भुरु याला आपल्या हवाली करा या मागणीसाठी लोकांनी तोडफोड केली. जमावाने या परिसरातील एक स्टार बस, पोलिसांची व्हॅनसह सात वाहनांची तोडफोड केली. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमारही केला. गेल्या नोव्हेंबरमध्ये नागपूरच्या वसंतराव नाईक झोपडपट्टी परिसरातील कुख्यात गुंड इक्बाल याला लोकांनी दगडाने ठेचून ठार केले होते. इक्बालचा लहान भाऊ भुरु याला पोलिसांनी कोर्टात आणले होते. यावेळी वसंतराव नाईक झोपडपट्टी भागातील पाचशेच्यावर लोक कोर्टात जमले होते. लोकांनी कोर्टाच्या आवारात खिडक्यांच्या काचा फोडल्या. वाहनांच्या काचाही लोकांनी भोडल्या. काही वर्षांपुर्वी नागपूरच्या याच सत्र न्यायालय परिसरात कुख्यात गुंड अक्कु यादव यालाही लोकांनी ठार केले होते. पोलिसांच्या समयसुचकतेमुळे आजच्या जमावाला नियंत्रित करत आले.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 4, 2013 11:24 AM IST

'गुंडाला ताब्यात द्या', जमावाची कोर्टाच्या परिसरात दगडफेक

04 मार्च

नागपूरमध्ये जिल्हा न्यायालय परिसरात संतप्त जमावानं जोरदार दगडफेक केली. कुख्यात गुंड भुरु याला आपल्या हवाली करा या मागणीसाठी लोकांनी तोडफोड केली. जमावाने या परिसरातील एक स्टार बस, पोलिसांची व्हॅनसह सात वाहनांची तोडफोड केली. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमारही केला. गेल्या नोव्हेंबरमध्ये नागपूरच्या वसंतराव नाईक झोपडपट्टी परिसरातील कुख्यात गुंड इक्बाल याला लोकांनी दगडाने ठेचून ठार केले होते. इक्बालचा लहान भाऊ भुरु याला पोलिसांनी कोर्टात आणले होते. यावेळी वसंतराव नाईक झोपडपट्टी भागातील पाचशेच्यावर लोक कोर्टात जमले होते. लोकांनी कोर्टाच्या आवारात खिडक्यांच्या काचा फोडल्या. वाहनांच्या काचाही लोकांनी भोडल्या. काही वर्षांपुर्वी नागपूरच्या याच सत्र न्यायालय परिसरात कुख्यात गुंड अक्कु यादव यालाही लोकांनी ठार केले होते. पोलिसांच्या समयसुचकतेमुळे आजच्या जमावाला नियंत्रित करत आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 4, 2013 11:24 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close