S M L

'प्रगाश'बँड बंद करण्याचा मुलींचा निर्णय

05 फेब्रुवारीकाश्मिरी मुलींच्या प्रगाश रॉक बँडला ऑनलाईन धमक्या देणार्‍यांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या मुलींना संरक्षण दिलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिलं आहे. पण आपल्याला संरक्षणाची गरज नाही, असं या रॉक बँडच्या मुलींचं म्हणणं आहे.दरम्यान, या बँडविरोधात काश्मीरच्या मुख्य मुफ्तींनी फतवा काढला होता. हा फतवा अन्यायकारक असल्याचं या मुलींचं म्हणणं आहे. पण आम्ही मुफ्तींचा आणि त्यांच्या निर्णयाचा आदर करतो, त्यामुळे आम्ही बँड बंद करत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. प्रगाश हा काश्मीरमधला तीन तरुण मुलींनी स्थापन केलेला काश्मीरमधला मुलींचा पहिला रॉक बँड आहे. काश्मीरचे मुख्य मुफ्ती बशीरुद्दीन यांनी या बँडविरोधात फतवा जारी केला. मुलींनी अशाप्रकारे सार्वजनिक ठिकाणी गाणं इस्लामविरोधी असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. तर त्यांना आलेल्या ऑनलाईन धमक्यांमुळेही या मुली घाबरल्या आहेत. पण आता अशा धमक्यांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 5, 2013 04:45 PM IST

'प्रगाश'बँड बंद करण्याचा मुलींचा निर्णय

05 फेब्रुवारी

काश्मिरी मुलींच्या प्रगाश रॉक बँडला ऑनलाईन धमक्या देणार्‍यांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या मुलींना संरक्षण दिलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिलं आहे. पण आपल्याला संरक्षणाची गरज नाही, असं या रॉक बँडच्या मुलींचं म्हणणं आहे.दरम्यान, या बँडविरोधात काश्मीरच्या मुख्य मुफ्तींनी फतवा काढला होता. हा फतवा अन्यायकारक असल्याचं या मुलींचं म्हणणं आहे. पण आम्ही मुफ्तींचा आणि त्यांच्या निर्णयाचा आदर करतो, त्यामुळे आम्ही बँड बंद करत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. प्रगाश हा काश्मीरमधला तीन तरुण मुलींनी स्थापन केलेला काश्मीरमधला मुलींचा पहिला रॉक बँड आहे. काश्मीरचे मुख्य मुफ्ती बशीरुद्दीन यांनी या बँडविरोधात फतवा जारी केला. मुलींनी अशाप्रकारे सार्वजनिक ठिकाणी गाणं इस्लामविरोधी असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. तर त्यांना आलेल्या ऑनलाईन धमक्यांमुळेही या मुली घाबरल्या आहेत. पण आता अशा धमक्यांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 5, 2013 04:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close