S M L

इचलकरंजीत यंत्रमाग कामगारांचा संप, 100कोटींची उलाढाल ठप्प

25 जानेवारीइचलकरंजीत यंत्रमाग कामगारांनी बेमुदत संप पुकारला आहे. त्यामुळे वस्त्रनगरीची तब्बल 100 कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. यंत्रमाग कामगारांनी आपल्या मजुरीमध्ये वाढ व्हावी अशी मागणी केलीय. या मागणीसाठी 21 तारखेपासून कामगारांनी बंद पुकारलाय. त्यानिमित्तानं यंत्रमाग कामगार रस्त्यावर उतरलेत. या कामगारांनी इचलकरंजीतल्या तहसील कार्यालयावर मोर्चा काढून आपल्या मागण्यांची समस्या शासन दरबारी दाखल केली आहे. त्यामुळे इचलकरंजीतली सूत आवक थांबली आहे. त्याचा परिणाम वाहतुकीवर होऊन सायझिंग आणि प्रोसेस उद्योगावरही त्याचा परिणाम झालाय. तर शहरातल्या बँकामधलेही व्यवहार गेले 4 दिवस बंद आहे. दरम्यान, या आंदोलनावर कधी तोडगा निघणार असाच सवाल सर्वसामान्य नागरिकांतून विचारला जातोय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 25, 2013 10:12 AM IST

इचलकरंजीत यंत्रमाग कामगारांचा संप, 100कोटींची उलाढाल ठप्प

25 जानेवारी

इचलकरंजीत यंत्रमाग कामगारांनी बेमुदत संप पुकारला आहे. त्यामुळे वस्त्रनगरीची तब्बल 100 कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. यंत्रमाग कामगारांनी आपल्या मजुरीमध्ये वाढ व्हावी अशी मागणी केलीय. या मागणीसाठी 21 तारखेपासून कामगारांनी बंद पुकारलाय. त्यानिमित्तानं यंत्रमाग कामगार रस्त्यावर उतरलेत. या कामगारांनी इचलकरंजीतल्या तहसील कार्यालयावर मोर्चा काढून आपल्या मागण्यांची समस्या शासन दरबारी दाखल केली आहे. त्यामुळे इचलकरंजीतली सूत आवक थांबली आहे. त्याचा परिणाम वाहतुकीवर होऊन सायझिंग आणि प्रोसेस उद्योगावरही त्याचा परिणाम झालाय. तर शहरातल्या बँकामधलेही व्यवहार गेले 4 दिवस बंद आहे. दरम्यान, या आंदोलनावर कधी तोडगा निघणार असाच सवाल सर्वसामान्य नागरिकांतून विचारला जातोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 25, 2013 10:12 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close