S M L

राष्ट्रवादीच्या महिला विभाग अध्यक्षांना गुंडांकडून मारहाण

08 मार्चमुंबई : एकीकडे महिला दिन साजरा होत असताना महिलांवरच्या अत्याचार्‍यांच्या घटनेत मात्र दिवसेंदिवस वाढच होतेय. मुंबईत मुलीची छेडछाड करणार्‍या गुंडांना जाब विचारण्यासाठी गेलेल्या एका महिलेला स्थानिक गुंडांनी अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे ही महिला राष्ट्रवादी काँग्रेसची महिला विभाग अध्यक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतल्या वांद्रे विभागाच्या महिला अध्यक्षांना गुरूवारी त्यांच्याच विभागातील गुंडांनी मारहाण केली. त्यांच्या घराजवळच मुलीची छेड काढणार्‍या गुंडांना जाब विचारला म्हणून त्यांना गुंडांनी मारहाण केली. तसेच त्यांच्या मुलीलाही मारहाण केली. राजकीय पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनाच अशा घटनांना सामोरं जावं लागत असेल तर सामान्य महिलांच्या सुरक्षिततेचं काय, असा प्रश्न आता विचारला जातोय.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 8, 2013 10:28 AM IST

राष्ट्रवादीच्या महिला विभाग अध्यक्षांना गुंडांकडून मारहाण

08 मार्च

मुंबई : एकीकडे महिला दिन साजरा होत असताना महिलांवरच्या अत्याचार्‍यांच्या घटनेत मात्र दिवसेंदिवस वाढच होतेय. मुंबईत मुलीची छेडछाड करणार्‍या गुंडांना जाब विचारण्यासाठी गेलेल्या एका महिलेला स्थानिक गुंडांनी अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे ही महिला राष्ट्रवादी काँग्रेसची महिला विभाग अध्यक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतल्या वांद्रे विभागाच्या महिला अध्यक्षांना गुरूवारी त्यांच्याच विभागातील गुंडांनी मारहाण केली. त्यांच्या घराजवळच मुलीची छेड काढणार्‍या गुंडांना जाब विचारला म्हणून त्यांना गुंडांनी मारहाण केली. तसेच त्यांच्या मुलीलाही मारहाण केली. राजकीय पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनाच अशा घटनांना सामोरं जावं लागत असेल तर सामान्य महिलांच्या सुरक्षिततेचं काय, असा प्रश्न आता विचारला जातोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 8, 2013 10:28 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close