S M L

नवी मुंबईतल्या बिल्डर हत्येप्रकरणी माजी पोलिस अधिकारी अटकेत

17 फेब्रुवारी 2013नवी मुंबई - बिल्डर सुनीलकुमार लोहारीया हत्या प्रकरणाला रविवारी धक्कादायक वळण लागलं. याप्रकरणी माजी पोलीस अधिकारी इमॅन्युएल अमोलिक याला अटक करण्यात आलीये तसच दुसरा आरोपी वाजीत कुरेशी याला मुंब्रायेथे पोलिसांनी केली अटक. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या तीन झालीये. या दोघांनाही 22 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलीये. सॅम्युलियन अमोलिक यांनी नवी मुंबईचेच सुरेश बिजलानी या बिल्डरचे 15 वर्ष बॉडिगार्ड म्हणून काम केलंय. 1992 मध्ये झालेल्या एका बनावट एन्काउंटरप्रकरणी अमोलिक यांना निलंबित करण्यात आलं होतं. तर दुसरा हल्लेखोर अजूनही फरार आहे. दरम्यान काल रात्रीही आपल्याला धमकीचे फोन आल्याचा आरोप लोहारिया यांच्या कुटुंबीयांनी केलाय. शनिवारी सकाळी सुनीलकुमार यांची हत्या करण्यात आली होती.कोण आहे अमोलिकमुंबई पोलिस दलात पीएसआय म्हणुन 1982-83 कार्यरत.1992 मुंबई क्राईम ब्रांचला नेमणुक. सुपारी घेऊन इन्काऊंटर केल्यामुळे त्याचं नाव चर्चेत आलं. 1992 मध्ये बाबू नावाच्या गुंडाचा फेक इन्काऊंटर केला. उल्हासनगर मध्ये फेक इन्काऊंटर केल्यामुळे उल्हासनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. 2003 मध्ये पोलिस दलातून निलंबित. सहा महिन्यानंतर पुन्हा मॅटच्या अंतर्गत त्याची पुन्हा पोलिस दलात कार्यरत. 2006 साली नवी मुंबई क्राईम ब्रांच मध्ये एपीआय म्हणुन नियुक्ती. दरम्यान नवी मुंबईतील बिल्डर सुरेश बिजलानी यांचा बॉडिगार्ड म्हणुन कार्यरत. 2009 साली पोलिस इन्सपॅक्टर म्हणुन कार्यरत. 2010 मुंब्रा येथील कौसा भागात इनकांटर केला. 2011 साली मुंब्रामध्ये पोलिस इन्सपॅक्टर म्हणुन निवृत्त.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 17, 2013 12:00 PM IST

नवी मुंबईतल्या बिल्डर हत्येप्रकरणी माजी पोलिस अधिकारी अटकेत

17 फेब्रुवारी 2013

नवी मुंबई - बिल्डर सुनीलकुमार लोहारीया हत्या प्रकरणाला रविवारी धक्कादायक वळण लागलं. याप्रकरणी माजी पोलीस अधिकारी इमॅन्युएल अमोलिक याला अटक करण्यात आलीये तसच दुसरा आरोपी वाजीत कुरेशी याला मुंब्रायेथे पोलिसांनी केली अटक. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या तीन झालीये. या दोघांनाही 22 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलीये. सॅम्युलियन अमोलिक यांनी नवी मुंबईचेच सुरेश बिजलानी या बिल्डरचे 15 वर्ष बॉडिगार्ड म्हणून काम केलंय. 1992 मध्ये झालेल्या एका बनावट एन्काउंटरप्रकरणी अमोलिक यांना निलंबित करण्यात आलं होतं. तर दुसरा हल्लेखोर अजूनही फरार आहे. दरम्यान काल रात्रीही आपल्याला धमकीचे फोन आल्याचा आरोप लोहारिया यांच्या कुटुंबीयांनी केलाय. शनिवारी सकाळी सुनीलकुमार यांची हत्या करण्यात आली होती.

कोण आहे अमोलिक

मुंबई पोलिस दलात पीएसआय म्हणुन 1982-83 कार्यरत.1992 मुंबई क्राईम ब्रांचला नेमणुक. सुपारी घेऊन इन्काऊंटर केल्यामुळे त्याचं नाव चर्चेत आलं. 1992 मध्ये बाबू नावाच्या गुंडाचा फेक इन्काऊंटर केला. उल्हासनगर मध्ये फेक इन्काऊंटर केल्यामुळे उल्हासनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. 2003 मध्ये पोलिस दलातून निलंबित. सहा महिन्यानंतर पुन्हा मॅटच्या अंतर्गत त्याची पुन्हा पोलिस दलात कार्यरत. 2006 साली नवी मुंबई क्राईम ब्रांच मध्ये एपीआय म्हणुन नियुक्ती. दरम्यान नवी मुंबईतील बिल्डर सुरेश बिजलानी यांचा बॉडिगार्ड म्हणुन कार्यरत. 2009 साली पोलिस इन्सपॅक्टर म्हणुन कार्यरत. 2010 मुंब्रा येथील कौसा भागात इनकांटर केला. 2011 साली मुंब्रामध्ये पोलिस इन्सपॅक्टर म्हणुन निवृत्त.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 17, 2013 12:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close