S M L

सुशीलकुमार शिंदेंची बेजबाबदार वक्तव्य

22 फेब्रुवारीहैदराबाद स्फोटांनंतर केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदें वर पुन्हा एकदा टीका होतेय. स्फोटांची माहिती गुप्तचर विभागाने दिली होती अशी माहिती त्यांनी दिली होती. माहिती होती तर स्फोट का रोखता आले नाही, हा सवाल त्यांना विचारण्यात येतोय. गृहमंत्री पदाचा कारभार स्वीकारल्यावर शिंदेंनी अशी अनेक वादग्रस्त आणि बेजबाबदार विधानं केली आहेत. पाहूया शिंदेंची बेजबाबदार वक्तव्य...सप्टेंबर 2012 : कोळसा खाण घोटाळा- 'बोफोर्स घोटाळ्याप्रमाणे कोळसा घोटाळाही लोक लवकरच विसरतील' - शिंदेऑगस्ट 2012 : खा. जया बच्चनबाबत वक्तव्य- आसममधल्या परिस्थितीविषयी संसदेत चर्चा सुरू असताना त्यांनी जया बच्चन यांना सल्ला. हे काळजीपूर्वक ऐका, हा गंभीर मुद्दा आहे, सिनेमा नाही - शिंदेडिसेंबर 2012 : दिल्ली बलात्कार प्रकरण- बलात्कारविरोधात आंदोलन करणार्‍यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचं समर्थन, आंदोलकांची तुलना माओवाद्यांशी जानेवारी 2013 : हिंदू दहशतवाद- भाजप आणि संघाच्या शिबिरांमध्ये दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जात असल्याचं वक्तव्यफेब्रुवारी 2013 : अफझल गुरूच्या फाशीबाबत- फाशीची माहिती अफझलच्या कुटुंबीयांना वेळेत न दिल्याबद्दल शिंदेंवर टीकाफेब्रुवारी 2013 : हैदराबाद साखळी स्फोट- गुप्तचर विभागाची माहिती असतानाही स्फोट रोखू न शकल्यामुळे टीका

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 22, 2013 04:18 PM IST

सुशीलकुमार शिंदेंची बेजबाबदार वक्तव्य

22 फेब्रुवारी

हैदराबाद स्फोटांनंतर केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदें वर पुन्हा एकदा टीका होतेय. स्फोटांची माहिती गुप्तचर विभागाने दिली होती अशी माहिती त्यांनी दिली होती. माहिती होती तर स्फोट का रोखता आले नाही, हा सवाल त्यांना विचारण्यात येतोय. गृहमंत्री पदाचा कारभार स्वीकारल्यावर शिंदेंनी अशी अनेक वादग्रस्त आणि बेजबाबदार विधानं केली आहेत. पाहूया शिंदेंची बेजबाबदार वक्तव्य...

सप्टेंबर 2012 : कोळसा खाण घोटाळा- 'बोफोर्स घोटाळ्याप्रमाणे कोळसा घोटाळाही लोक लवकरच विसरतील' - शिंदे

ऑगस्ट 2012 : खा. जया बच्चनबाबत वक्तव्य- आसममधल्या परिस्थितीविषयी संसदेत चर्चा सुरू असताना त्यांनी जया बच्चन यांना सल्ला. हे काळजीपूर्वक ऐका, हा गंभीर मुद्दा आहे, सिनेमा नाही - शिंदे

डिसेंबर 2012 : दिल्ली बलात्कार प्रकरण- बलात्कारविरोधात आंदोलन करणार्‍यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचं समर्थन, आंदोलकांची तुलना माओवाद्यांशी

जानेवारी 2013 : हिंदू दहशतवाद- भाजप आणि संघाच्या शिबिरांमध्ये दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जात असल्याचं वक्तव्य

फेब्रुवारी 2013 : अफझल गुरूच्या फाशीबाबत- फाशीची माहिती अफझलच्या कुटुंबीयांना वेळेत न दिल्याबद्दल शिंदेंवर टीका

फेब्रुवारी 2013 : हैदराबाद साखळी स्फोट- गुप्तचर विभागाची माहिती असतानाही स्फोट रोखू न शकल्यामुळे टीका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 22, 2013 04:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close