S M L

अबू जुंदालला कसाबच्या भूताने पछाडलं

06 मार्च26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याप्रकरणी तुरूंगात असलेल्या अबू जुंदालने स्वतःला वेगळ्या कोठडीत हलवण्याची मागणी केली आहे. जुंदालने स्वतःची प्रकृती खराब होत असल्याची तक्रार केली आहे तसेच आपल्याला अजमल कसाबची स्वप्नं पडत असल्याचंही त्यानं म्हटलं आहे. सौदी अरेबियामध्ये ताब्यात घेण्यात आल्यापासून आपली मानसिक अवस्था बिघडली असल्याचं त्याचं म्हणणं आहे. जुंदाल हा लष्कर ए तोयबाचा हस्तक असून तो सध्या आर्थर रोड तुरुंगात अंडा सेलमध्ये आहे. विशेष म्हणजे 26/11च्या हल्ल्यातला प्रमुख आरोपी अजमल कसाबला येरवड्याला हलवण्यापूर्वी याच सेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्याच सेलमध्ये आता अबू जुंदालला ठेवण्यात आलं आहे. कसाबला येरवड्यात फासावर लडकवण्यात आलं. त्यानंतर मुख्यसुत्रधार अबू जुंदालला या अंडा सेलमध्ये हलवण्यात आलं आहे. आता यासंदर्भात तुरुंगाधिकारी आज मोक्का न्यायाधीशांची भेट घेणार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 6, 2013 10:22 AM IST

अबू जुंदालला कसाबच्या भूताने पछाडलं

06 मार्च

26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याप्रकरणी तुरूंगात असलेल्या अबू जुंदालने स्वतःला वेगळ्या कोठडीत हलवण्याची मागणी केली आहे. जुंदालने स्वतःची प्रकृती खराब होत असल्याची तक्रार केली आहे तसेच आपल्याला अजमल कसाबची स्वप्नं पडत असल्याचंही त्यानं म्हटलं आहे. सौदी अरेबियामध्ये ताब्यात घेण्यात आल्यापासून आपली मानसिक अवस्था बिघडली असल्याचं त्याचं म्हणणं आहे. जुंदाल हा लष्कर ए तोयबाचा हस्तक असून तो सध्या आर्थर रोड तुरुंगात अंडा सेलमध्ये आहे. विशेष म्हणजे 26/11च्या हल्ल्यातला प्रमुख आरोपी अजमल कसाबला येरवड्याला हलवण्यापूर्वी याच सेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्याच सेलमध्ये आता अबू जुंदालला ठेवण्यात आलं आहे. कसाबला येरवड्यात फासावर लडकवण्यात आलं. त्यानंतर मुख्यसुत्रधार अबू जुंदालला या अंडा सेलमध्ये हलवण्यात आलं आहे. आता यासंदर्भात तुरुंगाधिकारी आज मोक्का न्यायाधीशांची भेट घेणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 6, 2013 10:22 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close