S M L

प्राध्यापकांचा 'बहिष्कार' संपता संपेना

08 मार्चराज्यभरातल्या प्राध्यापकांनी काम बंद ठेवण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचा पुनरुच्चार केला आहे. सरकारनं जाहीर केलेलं वक्तव्य आणि प्रत्यक्ष कागदोपत्री दिलेली आश्वासनं यात तफावत असल्याचं प्राध्यापकांचं म्हणणं आहे. त्यामुळे प्राध्यापक संपाच्या भूमिकेवर ठाम राहतील असा पुनरुच्चार प्राध्यापक संघटनांनी केला आहे. दोन दिवसांपुर्वीच प्राध्यापकांची मुख्य अटीपैकी बिगर नेट-सेटधारकांना नियमित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे तब्बल अडीच हजार प्राध्यापकांना याचा लाभ होणार आहे. तसंच प्राध्यापकांचे थकीत वेतन देण्यासाठी 1500 कोटी मंजूर करण्यात आले आहे. प्राध्यापकांनी बहिष्कार मागे घ्यावा असं आवाहन राज्य उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री राजेश टोपे यांनी केलं होतं. मात्र प्राध्यापकांनी आंदोलनावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 8, 2013 10:36 AM IST

प्राध्यापकांचा 'बहिष्कार' संपता संपेना

08 मार्च

राज्यभरातल्या प्राध्यापकांनी काम बंद ठेवण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचा पुनरुच्चार केला आहे. सरकारनं जाहीर केलेलं वक्तव्य आणि प्रत्यक्ष कागदोपत्री दिलेली आश्वासनं यात तफावत असल्याचं प्राध्यापकांचं म्हणणं आहे. त्यामुळे प्राध्यापक संपाच्या भूमिकेवर ठाम राहतील असा पुनरुच्चार प्राध्यापक संघटनांनी केला आहे. दोन दिवसांपुर्वीच प्राध्यापकांची मुख्य अटीपैकी बिगर नेट-सेटधारकांना नियमित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे तब्बल अडीच हजार प्राध्यापकांना याचा लाभ होणार आहे. तसंच प्राध्यापकांचे थकीत वेतन देण्यासाठी 1500 कोटी मंजूर करण्यात आले आहे. प्राध्यापकांनी बहिष्कार मागे घ्यावा असं आवाहन राज्य उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री राजेश टोपे यांनी केलं होतं. मात्र प्राध्यापकांनी आंदोलनावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 8, 2013 10:36 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close