S M L

शालेय वस्तू तुम्ही घ्या पैसे पालिका देणार !

04 फेब्रुवारीमुंबई महापालिकेचा 28 हजार कोटींचा अर्थसंकल्प आज सादर होणार आहे. शिक्षण विभागाचं बजेट सादर करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना शालेय वस्तू मोफत न देता त्याचे पैसे थेट पालकांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत. प्राथमिक शिक्षणासाठी 82.12 कोटी रूपयांची तरतूद तर माध्यमिक शिक्षणासाठी 15.29 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या वर्षी शालेय गणवेश, वह्या, पुस्तकं, रेनकोट,छत्र्या इत्यादी साहित्य विद्यार्थ्यांना देण्यात येत होते. मात्र महापालिका ते साहित्य देण्यास अपयशी ठरल्याने प्रशासनाने यावर्षी ही उपाय योजना सुचवली आहे. सर्व शिक्षा अभियान अभियानांतर्गत रस्त्यावर राहणार्‍या मुलांसाठी शाळा आणि वसतीगृह तयार करणार आहे.मुंबई महापालिकेचं शिक्षण विभागाचं बजेट सादर- विद्यार्थ्यांना शालेय वस्तू मोफत न देता त्याचे पैसे थेट पालकांच्या खात्यात जमा करणार- प्राथमिक शिक्षणासाठी 82.12 कोटी रूपयांची तरतूद- माध्यमिक शिक्षणासाठी 15.29 कोटींची तरतूद- प्राथमिक शाळेसाठी - सुगंधी दुध योजनेसाठी 114.32 कोटी- माध्यमिक शाळेसाठी 17.69 कोटी- सर्व शिक्षा अभियान अभियानांतर्गत रस्त्यावर राहणार्‍या मुलांसाठी शाळा आणि वसतीगृह तयार करणार- सातवीत शिकणार्‍या मुलींच्या नावे राष्ट्रीयकृत बँकेत 2500 रूपये ठेवणार- 480 प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरूम तयार करणार्‍यासाठी 26.50 कोटींची तरतूद- सर्व शाळा इंटरनेटने जोडणार त्यासाठी 5.2 कोटींची तरतूद- 63 शाळांच्या दुरूस्तीसाठी 262.23 कोटींची तरतूद

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 4, 2013 10:59 AM IST

शालेय वस्तू तुम्ही घ्या पैसे पालिका देणार !

04 फेब्रुवारी

मुंबई महापालिकेचा 28 हजार कोटींचा अर्थसंकल्प आज सादर होणार आहे. शिक्षण विभागाचं बजेट सादर करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना शालेय वस्तू मोफत न देता त्याचे पैसे थेट पालकांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत. प्राथमिक शिक्षणासाठी 82.12 कोटी रूपयांची तरतूद तर माध्यमिक शिक्षणासाठी 15.29 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या वर्षी शालेय गणवेश, वह्या, पुस्तकं, रेनकोट,छत्र्या इत्यादी साहित्य विद्यार्थ्यांना देण्यात येत होते. मात्र महापालिका ते साहित्य देण्यास अपयशी ठरल्याने प्रशासनाने यावर्षी ही उपाय योजना सुचवली आहे. सर्व शिक्षा अभियान अभियानांतर्गत रस्त्यावर राहणार्‍या मुलांसाठी शाळा आणि वसतीगृह तयार करणार आहे.

मुंबई महापालिकेचं शिक्षण विभागाचं बजेट सादर

- विद्यार्थ्यांना शालेय वस्तू मोफत न देता त्याचे पैसे थेट पालकांच्या खात्यात जमा करणार- प्राथमिक शिक्षणासाठी 82.12 कोटी रूपयांची तरतूद- माध्यमिक शिक्षणासाठी 15.29 कोटींची तरतूद- प्राथमिक शाळेसाठी - सुगंधी दुध योजनेसाठी 114.32 कोटी- माध्यमिक शाळेसाठी 17.69 कोटी- सर्व शिक्षा अभियान अभियानांतर्गत रस्त्यावर राहणार्‍या मुलांसाठी शाळा आणि वसतीगृह तयार करणार- सातवीत शिकणार्‍या मुलींच्या नावे राष्ट्रीयकृत बँकेत 2500 रूपये ठेवणार- 480 प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरूम तयार करणार्‍यासाठी 26.50 कोटींची तरतूद- सर्व शाळा इंटरनेटने जोडणार त्यासाठी 5.2 कोटींची तरतूद- 63 शाळांच्या दुरूस्तीसाठी 262.23 कोटींची तरतूद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 4, 2013 10:59 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close