S M L

राज ठाकरेंना पुन्हा टाळी नाही - जोशी

18 फेब्रुवारीशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यापुढे केलेला मैत्रीचा हात ही लाचारी नव्हती, तो मराठी माणसाच्या हितासाठी हात पुढे केला होता त्यामुळे आता आपण कोणताही प्रयत्न करणार नसल्याचं शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी स्पष्ट केलं आहे. राज ठाकरेंच्या नकारानं निराश झाल्याची प्रतिक्रीयाही त्यांनी दिली. प्रा. अशोक चिटणीस यांच्या अमृतमहोत्सव समारंभासाठी मनोहर जोशी ठाण्यात आले होते यावेळी ते बोलत होते. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच शिवसेना आणि मनसे एकत्र येण्यासाठी राज ठाकरे यांच्यापुढे 'टाळी'साठी हात पुढे केला. उद्धव-राज एकत्र येणार? टाळी एका हाताने वाजत नाही. या प्रश्नाचं उत्तर फक्त माझ्याकडे मागू शकत नाही. त्यासाठी आम्हा 'दोघांना' एकत्र आणून समोरासमोर बसवा, बाजूबाजूला बसवा आणि मग हा प्रश्न विचारा. या प्रश्नाचं उत्तर दोन्ही बाजूंवर अवलंबून आहे. कारण मी काहीही उत्तर दिलं आणि त्याच्या मनात नसेल तर ? पण कोणी मनापासून शिवसेनेसोबत येणार असेल तर त्यांचे स्वागतच करू असं स्पष्ट सांगत उद्धव ठाकरे यांनी राज यांच्यापुढे मैत्रीचा हात पुढे केला होता. पण 'दादू'(उद्धव ठाकरे)च्या टाळीला राज यांनी टोला लगावला. कोल्हापूरमध्ये झालेल्या सभेत भविष्यात कुठल्याही पक्षासोबत युतीचा विचार नसल्याचं राज यांनी स्पष्ट केलं. युतीच्या चर्चा ही वृत्तपत्रातून होत नाही असा टोलाही राज यांनी लगावला. मनसे आपल्या ताकदीवर पुढे येत इशून स्वबळावर आम्ही सत्ता मिळवू असा विश्वासही राज यांनी व्यक्त केला होता. राज यांनी टाळी ऐवजी टोला दिल्यामुळे शिवसेनेनं कोणीतीच दखल घेतली नाही. एव्हान सेनेच्या मुखपत्र सामनामध्ये राज यांच्या सभेची बातमीही प्रसिद्ध करण्यात आली नाही. त्यामुळे राज यांच्या टोल्यामुळे नाराज झालेल्या शिवसेनेनं आठवड्यानंतर प्रतिक्रिया दिली आणि आता टाळी देणार नाही असं मनोहर जोशी यांनी स्पष्ट केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 18, 2013 08:42 AM IST

राज ठाकरेंना पुन्हा टाळी नाही - जोशी

18 फेब्रुवारी

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यापुढे केलेला मैत्रीचा हात ही लाचारी नव्हती, तो मराठी माणसाच्या हितासाठी हात पुढे केला होता त्यामुळे आता आपण कोणताही प्रयत्न करणार नसल्याचं शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी स्पष्ट केलं आहे. राज ठाकरेंच्या नकारानं निराश झाल्याची प्रतिक्रीयाही त्यांनी दिली. प्रा. अशोक चिटणीस यांच्या अमृतमहोत्सव समारंभासाठी मनोहर जोशी ठाण्यात आले होते यावेळी ते बोलत होते.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच शिवसेना आणि मनसे एकत्र येण्यासाठी राज ठाकरे यांच्यापुढे 'टाळी'साठी हात पुढे केला. उद्धव-राज एकत्र येणार? टाळी एका हाताने वाजत नाही. या प्रश्नाचं उत्तर फक्त माझ्याकडे मागू शकत नाही. त्यासाठी आम्हा 'दोघांना' एकत्र आणून समोरासमोर बसवा, बाजूबाजूला बसवा आणि मग हा प्रश्न विचारा. या प्रश्नाचं उत्तर दोन्ही बाजूंवर अवलंबून आहे. कारण मी काहीही उत्तर दिलं आणि त्याच्या मनात नसेल तर ? पण कोणी मनापासून शिवसेनेसोबत येणार असेल तर त्यांचे स्वागतच करू असं स्पष्ट सांगत उद्धव ठाकरे यांनी राज यांच्यापुढे मैत्रीचा हात पुढे केला होता. पण 'दादू'(उद्धव ठाकरे)च्या टाळीला राज यांनी टोला लगावला. कोल्हापूरमध्ये झालेल्या सभेत भविष्यात कुठल्याही पक्षासोबत युतीचा विचार नसल्याचं राज यांनी स्पष्ट केलं. युतीच्या चर्चा ही वृत्तपत्रातून होत नाही असा टोलाही राज यांनी लगावला. मनसे आपल्या ताकदीवर पुढे येत इशून स्वबळावर आम्ही सत्ता मिळवू असा विश्वासही राज यांनी व्यक्त केला होता. राज यांनी टाळी ऐवजी टोला दिल्यामुळे शिवसेनेनं कोणीतीच दखल घेतली नाही. एव्हान सेनेच्या मुखपत्र सामनामध्ये राज यांच्या सभेची बातमीही प्रसिद्ध करण्यात आली नाही. त्यामुळे राज यांच्या टोल्यामुळे नाराज झालेल्या शिवसेनेनं आठवड्यानंतर प्रतिक्रिया दिली आणि आता टाळी देणार नाही असं मनोहर जोशी यांनी स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 18, 2013 08:42 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close