S M L

कुपोषणामुळे 4 वर्षांत 1 लाखांच्यावर बालकांचा मृत्यू

06 फेब्रुवारीमुलांच्या आरोग्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या हस्ते केंद्र सरकारच्या क्रांतीकारी योजनेचा शुभारंभ तर झाला. पण दुसरीकडे हा सोहळा होणार्‍या महाराष्ट्रातली लाखो मुलं त्यांच्या पाचव्या वाढदिवसाच्या आधीच दगावत आहे. राज्यात गेल्या 4 वर्षात तब्बल 1 लाख 17 हजार 496 बालमृत्यू झालेत. महाराष्ट्रात जन्माला येणार्‍या दर हजार मुलांपैकी 36 बालक पाचव्या वर्षाआधीच मृत्यूमुखी पडतायत. बालमृत्यू आणि कुपोषण हे बालकांचं आरोग्य मोजण्याचे महत्त्वाचे निकष मानले जातात. पण, राज्यात नंदुरबार, ठाणे, चंद्रपूर, अमरावती आणि गडचिरोली या आदिवासी जिल्ह्यांमधलं कुपोषण आणि बालमृत्यू रोखण्यात सरकारला अपयश येतंय. कुपोषण कमी करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे महाराष्ट्राला दर वर्षी 1280 कोटी रुपयांचा निधी देण्यात येतो. महाराष्ट्रानं तब्बल 10 कोटी रुपयांचं लिक्विड प्रोटीन एकट्या आदिवासी विकास विभागातर्फे दरवर्षी खरेदी केलं. पण, आजही नंदुरबार सारख्या जिल्ह्यात 5 हजार मुलांचे जीव कुपोषणामुळे धोक्यात आले आहेत. गेल्या 5 वर्षात एकट्या नंदुरबारमध्ये 5 हजार 348 बालमृत्यू झालेत. कुपोषणाच्या विळख्यात महाराष्ट्र- 1 हजार बालकांपैकी 36 बालकांचा मृत्यू- गेल्या 4 वर्षांत- नंदूरबारमध्ये 5,348 बालमृत्यू - राज्यात 1 लाख 17,496 बालमृत्यूमहाराष्ट्रात कोट्यवधींची उधळण - केंद्राकडून दरवर्षी 1,280 कोटींचा निधी - वर्षभरात लिक्विड प्रोटीनच्या खरेदीवर 10 कोटी खर्च

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 6, 2013 09:47 AM IST

कुपोषणामुळे 4 वर्षांत 1 लाखांच्यावर बालकांचा मृत्यू

06 फेब्रुवारी

मुलांच्या आरोग्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या हस्ते केंद्र सरकारच्या क्रांतीकारी योजनेचा शुभारंभ तर झाला. पण दुसरीकडे हा सोहळा होणार्‍या महाराष्ट्रातली लाखो मुलं त्यांच्या पाचव्या वाढदिवसाच्या आधीच दगावत आहे. राज्यात गेल्या 4 वर्षात तब्बल 1 लाख 17 हजार 496 बालमृत्यू झालेत. महाराष्ट्रात जन्माला येणार्‍या दर हजार मुलांपैकी 36 बालक पाचव्या वर्षाआधीच मृत्यूमुखी पडतायत. बालमृत्यू आणि कुपोषण हे बालकांचं आरोग्य मोजण्याचे महत्त्वाचे निकष मानले जातात. पण, राज्यात नंदुरबार, ठाणे, चंद्रपूर, अमरावती आणि गडचिरोली या आदिवासी जिल्ह्यांमधलं कुपोषण आणि बालमृत्यू रोखण्यात सरकारला अपयश येतंय. कुपोषण कमी करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे महाराष्ट्राला दर वर्षी 1280 कोटी रुपयांचा निधी देण्यात येतो. महाराष्ट्रानं तब्बल 10 कोटी रुपयांचं लिक्विड प्रोटीन एकट्या आदिवासी विकास विभागातर्फे दरवर्षी खरेदी केलं. पण, आजही नंदुरबार सारख्या जिल्ह्यात 5 हजार मुलांचे जीव कुपोषणामुळे धोक्यात आले आहेत. गेल्या 5 वर्षात एकट्या नंदुरबारमध्ये 5 हजार 348 बालमृत्यू झालेत.

कुपोषणाच्या विळख्यात महाराष्ट्र

- 1 हजार बालकांपैकी 36 बालकांचा मृत्यू- गेल्या 4 वर्षांत- नंदूरबारमध्ये 5,348 बालमृत्यू - राज्यात 1 लाख 17,496 बालमृत्यूमहाराष्ट्रात कोट्यवधींची उधळण

- केंद्राकडून दरवर्षी 1,280 कोटींचा निधी - वर्षभरात लिक्विड प्रोटीनच्या खरेदीवर 10 कोटी खर्च

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 6, 2013 09:47 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close