S M L

दाभोळ प्रकल्प केंद्र सरकारकडे सोपवणार -अजित पवार

12 मार्चमुंबई : गॅसच्या अभावामुळे दाभोळ वीज प्रकल्प केंद्र सरकारकडे सोपवण्याचा राज्य सरकार विचार करत आहे अशी माहिती उर्जा मंत्री अजित पवार यांनी लेखी उत्तरातून दिली आहेत. दाभोळ प्रकल्पातून 2200 मेगावॅट ऐवजी 600 मेगावॅट वीजनिर्मिती होतेय याचं कारण काय असा प्रश्न शिवसेनेच्या आमदारांनी विधान परिषदेत विचारला होता. त्याला उत्तर देताना गॅस उपलब्ध नसल्यामुळे वीजनिर्मिती पूर्ण क्षमतेने होऊ शकत नाही असं उत्तर ऊर्जामंत्र्यांनी दिलं. आणि त्यामुळे वीजनिर्मिती आर्थिकदृष्ट्या परवडत नाही म्हणून हा प्रकल्प केंद्र सरकारला हस्तांतरित करून त्याबदल्यात एनटीपीसी दराने वीज घेता येईल का ? अशा आशयाचा प्रस्ताव महावितरणने राज्य सरकारला पाठवलाय, अशी माहितीही त्यांनी लेखी उत्तराने दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 12, 2013 10:05 AM IST

दाभोळ प्रकल्प केंद्र सरकारकडे सोपवणार -अजित पवार

12 मार्च

मुंबई : गॅसच्या अभावामुळे दाभोळ वीज प्रकल्प केंद्र सरकारकडे सोपवण्याचा राज्य सरकार विचार करत आहे अशी माहिती उर्जा मंत्री अजित पवार यांनी लेखी उत्तरातून दिली आहेत. दाभोळ प्रकल्पातून 2200 मेगावॅट ऐवजी 600 मेगावॅट वीजनिर्मिती होतेय याचं कारण काय असा प्रश्न शिवसेनेच्या आमदारांनी विधान परिषदेत विचारला होता. त्याला उत्तर देताना गॅस उपलब्ध नसल्यामुळे वीजनिर्मिती पूर्ण क्षमतेने होऊ शकत नाही असं उत्तर ऊर्जामंत्र्यांनी दिलं. आणि त्यामुळे वीजनिर्मिती आर्थिकदृष्ट्या परवडत नाही म्हणून हा प्रकल्प केंद्र सरकारला हस्तांतरित करून त्याबदल्यात एनटीपीसी दराने वीज घेता येईल का ? अशा आशयाचा प्रस्ताव महावितरणने राज्य सरकारला पाठवलाय, अशी माहितीही त्यांनी लेखी उत्तराने दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 12, 2013 10:05 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close