S M L

मी राज ठाकरेंच्या परवानगीने चीनला गेलो होतो -कदम

12 मार्चमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची परवानगी घेऊनच चीनमध्ये मित्राच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी गेलो होतो अशी माहिती आमदार राम कदम यांनी आयबीएन लोकमतला दिली. मी मनसेमध्ये अस्वस्थ असल्याचं वृत्त खोटं असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच दोन दिवसांत मुंबईत परतणार असल्याचा खुलासाही त्यांनी केला. विधिमंडळ अधिवेशन सुरू असताना राम कदम गैरहजर असल्याने राजकीय चर्चेला उधाण आलं होतं. मनसेच्या वर्धापन दिनालाही ते उपस्थित नव्हते. त्यामुळे राम कदम अस्वस्थ आहेत अशी कुजबूज सुरू झाली होती. तसंच सोशल मीडियावर दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे पुत्र राहुल महाजन आणि राम कदम एका वाढदिवसाच्या पार्टीत एकत्र असल्याचे फोटो प्रसिद्ध झाले होते. मात्र राम कदम यांनी सर्व प्रकरणावर पडदा टाकत आपण अस्वस्थ नाही. लवकरच मुंबईला येणार असून विधिमंडळाच्या अधिवेशनात सहभाग घेणार आहोत असं सांगितलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 12, 2013 10:25 AM IST

मी राज ठाकरेंच्या परवानगीने चीनला गेलो होतो -कदम

12 मार्च

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची परवानगी घेऊनच चीनमध्ये मित्राच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी गेलो होतो अशी माहिती आमदार राम कदम यांनी आयबीएन लोकमतला दिली. मी मनसेमध्ये अस्वस्थ असल्याचं वृत्त खोटं असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच दोन दिवसांत मुंबईत परतणार असल्याचा खुलासाही त्यांनी केला. विधिमंडळ अधिवेशन सुरू असताना राम कदम गैरहजर असल्याने राजकीय चर्चेला उधाण आलं होतं. मनसेच्या वर्धापन दिनालाही ते उपस्थित नव्हते. त्यामुळे राम कदम अस्वस्थ आहेत अशी कुजबूज सुरू झाली होती. तसंच सोशल मीडियावर दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे पुत्र राहुल महाजन आणि राम कदम एका वाढदिवसाच्या पार्टीत एकत्र असल्याचे फोटो प्रसिद्ध झाले होते. मात्र राम कदम यांनी सर्व प्रकरणावर पडदा टाकत आपण अस्वस्थ नाही. लवकरच मुंबईला येणार असून विधिमंडळाच्या अधिवेशनात सहभाग घेणार आहोत असं सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 12, 2013 10:25 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close