S M L

वाळू माफियाचा पोलीस कॉन्स्टेबलला ट्रक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न

01 मार्चजळगांव जिल्ह्यातील चाळीसगावमध्ये अवैध वाळू वाहतूकदारांची माफिया'गिरी' राजरोसपणे सुरू आहे. ही वाहतूक रोखणार्‍या पोलीस हवालदाराच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याची घटना चाळीसगावात घडली आहे. या घटनेत हा हवालदार गंभीर जखमी झाला आहे. महेन्द्र पाटील असं या जखमी पोलीस हवालदाराचं नाव आहे. जखमी पोलिसाला तातडीनं नाशिकला उपचारासाठी हलविण्यात आलं आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत 14 ट्रॅक्टर जप्त केले आहेत. पण संशयित आरोपी फरार झाले आहे. पोलीस या आरोपीचा शोध घेत आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 1, 2013 11:11 AM IST

वाळू माफियाचा पोलीस कॉन्स्टेबलला ट्रक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न

01 मार्च

जळगांव जिल्ह्यातील चाळीसगावमध्ये अवैध वाळू वाहतूकदारांची माफिया'गिरी' राजरोसपणे सुरू आहे. ही वाहतूक रोखणार्‍या पोलीस हवालदाराच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याची घटना चाळीसगावात घडली आहे. या घटनेत हा हवालदार गंभीर जखमी झाला आहे. महेन्द्र पाटील असं या जखमी पोलीस हवालदाराचं नाव आहे. जखमी पोलिसाला तातडीनं नाशिकला उपचारासाठी हलविण्यात आलं आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत 14 ट्रॅक्टर जप्त केले आहेत. पण संशयित आरोपी फरार झाले आहे. पोलीस या आरोपीचा शोध घेत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 1, 2013 11:11 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close