S M L

रूपी बँकेवर आरबीआयचे निर्बंध

23 फेब्रुवारीचौदाशे कोटींपेक्षा जास्त ठेवी असलेल्या पुण्यातल्या रूपी कोऑपरेटीव्ह बँकेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने प्रशासकीय निर्बंध घातले आहेत. 35 ए या नियमांतर्गत हे निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे रूपी बँकेच्या खातेदारांना पुढील सहा महिन्यापर्यंत आपल्या खात्यातून एकदाच फक्त एक हजार रूपये इतकीच रक्कम काढता येईल. रूपी बँकेच्या एकूण 39 शाखा आहेत. त्यातल्या तब्बल सात लाख ठेवीदारांना याचा फटका बसणार आहे. बँकेच्या खातेदारांना प्रशासकीय निर्बंधाची बातमी कळताच खातेदारांनी बँकेच्या काही शाखांमध्ये पैसे काढण्यासाठी एकच गर्दी केली. आरबीआयकडून हे निर्बंध घालण्यात आल्यामुळे पुढील सहा महिन्यापर्यंत बँकेला नव्या ठेवी स्विकारता येणार नाही. तसेच नवी कर्ज सुध्दा देता येणार नाही. कर्ज वसुलीचा वेग कमी असल्याने आरबीआयकडून हे निर्बंध घालण्यात आले असल्याची शक्यता बँकेकडून सांगण्यात आली आहे. मात्र बँकेची आर्थिक स्थिती चांगली असल्याचा दावा बँकेच्या संचालकांनी केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 23, 2013 12:53 PM IST

रूपी बँकेवर आरबीआयचे निर्बंध

23 फेब्रुवारी

चौदाशे कोटींपेक्षा जास्त ठेवी असलेल्या पुण्यातल्या रूपी कोऑपरेटीव्ह बँकेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने प्रशासकीय निर्बंध घातले आहेत. 35 ए या नियमांतर्गत हे निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे रूपी बँकेच्या खातेदारांना पुढील सहा महिन्यापर्यंत आपल्या खात्यातून एकदाच फक्त एक हजार रूपये इतकीच रक्कम काढता येईल. रूपी बँकेच्या एकूण 39 शाखा आहेत. त्यातल्या तब्बल सात लाख ठेवीदारांना याचा फटका बसणार आहे. बँकेच्या खातेदारांना प्रशासकीय निर्बंधाची बातमी कळताच खातेदारांनी बँकेच्या काही शाखांमध्ये पैसे काढण्यासाठी एकच गर्दी केली. आरबीआयकडून हे निर्बंध घालण्यात आल्यामुळे पुढील सहा महिन्यापर्यंत बँकेला नव्या ठेवी स्विकारता येणार नाही. तसेच नवी कर्ज सुध्दा देता येणार नाही. कर्ज वसुलीचा वेग कमी असल्याने आरबीआयकडून हे निर्बंध घालण्यात आले असल्याची शक्यता बँकेकडून सांगण्यात आली आहे. मात्र बँकेची आर्थिक स्थिती चांगली असल्याचा दावा बँकेच्या संचालकांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 23, 2013 12:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close