S M L

वीज बिल थकल्यामुळे ऐन परीक्षेच्या काळात 3 वसतीगृह अंधारात

01 मार्चनंदूरबार जिल्ह्यातल्या खांडबारा या आदिवासी वसतीगृहातल्या विद्यार्थ्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे. गेल्या तीन दिवसांपासून या वसतीगृहाची वीज कापण्यात आली आहे. कारण आदिवासी विकास विभागाने त्याचं बील भरलेलं नाही. वसतीगृहात बारावीचे 50 विद्यार्थी आहेत. वीज कापल्यामुळे पाण्याचे पंपही बंद आहेत. त्यामुळे ऐन परीक्षेच्या दिवसांत विद्यार्थ्यांचे वीज आणि पाण्यावाचून हाल होत आहे. वीज कनेक्शन पुन्हा जोडलं जावं या मागणीसाठी त्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय. शहरातील तीन आश्रमशाळा याच कारणामुळे गेल्या तीन महिन्यांपासून अंधारात आहेत. त्यामुळे जोपर्यंत वीज कनेक्शन जोडलं जात नाही तोपर्यंत त्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय. बिलाच्या थकबाकीमुळे लाईट कापल्याची ही पहिलीच घटना नाही. नंदुरबारमधल्या बर्‍याच आश्रमशाळांमध्ये आणि वस्तीगृहांमध्ये बिलं न भरल्यानं अंधार आहे. काही दिवसांपूर्वी गुरुकूल नगरमधल्या वस्तीगृहातही अशीच लाईट कापण्यात आली होती. आदिवासी विकास मंत्र्यांनी मध्यस्थी केल्यावर वीज कनेक्शन जोडून देण्यात आलं. मात्र, अद्यापही जिल्ह्यातल्या तीन आश्रमशाळांमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून अंधार आहे. वीज बिलाची थकबाकी - बोरचक आश्रमशाळा - रु. 54 हजार - खडकी आश्रमशाळा - रु. 77 हजार - खांडबारा वसतीगृह - रु. 55 हजार - वाघाडे आश्रमशाळा - रु. 8 हजार

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 1, 2013 11:19 AM IST

वीज बिल थकल्यामुळे ऐन परीक्षेच्या काळात 3 वसतीगृह अंधारात

01 मार्च

नंदूरबार जिल्ह्यातल्या खांडबारा या आदिवासी वसतीगृहातल्या विद्यार्थ्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे. गेल्या तीन दिवसांपासून या वसतीगृहाची वीज कापण्यात आली आहे. कारण आदिवासी विकास विभागाने त्याचं बील भरलेलं नाही. वसतीगृहात बारावीचे 50 विद्यार्थी आहेत. वीज कापल्यामुळे पाण्याचे पंपही बंद आहेत. त्यामुळे ऐन परीक्षेच्या दिवसांत विद्यार्थ्यांचे वीज आणि पाण्यावाचून हाल होत आहे. वीज कनेक्शन पुन्हा जोडलं जावं या मागणीसाठी त्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय. शहरातील तीन आश्रमशाळा याच कारणामुळे गेल्या तीन महिन्यांपासून अंधारात आहेत. त्यामुळे जोपर्यंत वीज कनेक्शन जोडलं जात नाही तोपर्यंत त्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय. बिलाच्या थकबाकीमुळे लाईट कापल्याची ही पहिलीच घटना नाही. नंदुरबारमधल्या बर्‍याच आश्रमशाळांमध्ये आणि वस्तीगृहांमध्ये बिलं न भरल्यानं अंधार आहे. काही दिवसांपूर्वी गुरुकूल नगरमधल्या वस्तीगृहातही अशीच लाईट कापण्यात आली होती. आदिवासी विकास मंत्र्यांनी मध्यस्थी केल्यावर वीज कनेक्शन जोडून देण्यात आलं. मात्र, अद्यापही जिल्ह्यातल्या तीन आश्रमशाळांमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून अंधार आहे.

वीज बिलाची थकबाकी - बोरचक आश्रमशाळा - रु. 54 हजार - खडकी आश्रमशाळा - रु. 77 हजार - खांडबारा वसतीगृह - रु. 55 हजार - वाघाडे आश्रमशाळा - रु. 8 हजार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 1, 2013 11:19 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close