S M L

आयकर विभागाच्या नोटिसीमुळे साखर कारखाने अडचणीत

04 मार्चआयकर विभागाच्या नोटिसीमुळे राज्यातले सहकारी साखर कारखाने मोठ्या अडचणीत सापडले आहेत. 56 सहकारी साखर कराखान्यांना आयकर विभागानं नोटिसा बजावल्या आहे. 3 हजार 500 कोटी रूपयांची आयकर थकबाकी सहकारी साखर कारखान्यांवर असल्याने या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. 31 मार्च 2013 पर्यंत आयकर जमा केला नाही तर सहकारी साखर कारखान्यांवर जप्तीची कारवाई करण्यात येईल असं या नोटीसमध्ये म्हटलं आहे. पण सहकारी साखर कारखान्यांकडून चुकीचे आयकर आकारण्यात येत असल्याचं शेतकरी संघटनेचं म्हणणं आहे. या संर्दभात आज शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांची राज्याच्या मुख्य आयकर आयुक्तांसोबत बैठक झाली. येत्या 11 मार्च पर्यंत यासंदर्भातला अंतिम निर्णय दिला जाईल आणि तो सहकारी साखर कारखाण्यासाठी सकारात्मक असेल अस आश्वासन आयकर आयुक्तांनी दिला आहे. तसंच 11 मार्च पर्यंत साखर कारखाण्यावर कोणतीही कारवाई होणार नाही याची ग्वाही सुध्दा आयकर आयुक्तांनी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांना दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 4, 2013 03:58 PM IST

आयकर विभागाच्या नोटिसीमुळे साखर कारखाने अडचणीत

04 मार्च

आयकर विभागाच्या नोटिसीमुळे राज्यातले सहकारी साखर कारखाने मोठ्या अडचणीत सापडले आहेत. 56 सहकारी साखर कराखान्यांना आयकर विभागानं नोटिसा बजावल्या आहे. 3 हजार 500 कोटी रूपयांची आयकर थकबाकी सहकारी साखर कारखान्यांवर असल्याने या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. 31 मार्च 2013 पर्यंत आयकर जमा केला नाही तर सहकारी साखर कारखान्यांवर जप्तीची कारवाई करण्यात येईल असं या नोटीसमध्ये म्हटलं आहे. पण सहकारी साखर कारखान्यांकडून चुकीचे आयकर आकारण्यात येत असल्याचं शेतकरी संघटनेचं म्हणणं आहे. या संर्दभात आज शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांची राज्याच्या मुख्य आयकर आयुक्तांसोबत बैठक झाली. येत्या 11 मार्च पर्यंत यासंदर्भातला अंतिम निर्णय दिला जाईल आणि तो सहकारी साखर कारखाण्यासाठी सकारात्मक असेल अस आश्वासन आयकर आयुक्तांनी दिला आहे. तसंच 11 मार्च पर्यंत साखर कारखाण्यावर कोणतीही कारवाई होणार नाही याची ग्वाही सुध्दा आयकर आयुक्तांनी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांना दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 4, 2013 03:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close