S M L

भारत 3 विकेट 182 रन्स; सचिन, कोहलीची हाफसेंच्युरी

23 फेब्रुवारीचेन्नई टेस्टमध्ये भारतानं ऑस्ट्रेलियाला चोख उत्तर दिलं आहे. दुसर्‍या दिवसअखेर भारताने 3 विकेट गमावत 182 रन्स केले आहे. पहिल्या इनिंगमध्ये भारतीय टीम अजून 198 रन्सने पिछाडीवर आहे. चेन्नई टेस्टच्या दुसर्‍या दिवसाचं वैशिष्टय ठरलं ते सचिन तेंडुलकरची हाफ सेंच्युरी आणि ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर जेम्स पॅटिन्सनंची भेदक बॉलिंग.. मायकेल क्लार्कच्या 130 रन्सच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं पहिल्या इनिंगमध्ये 380 रन्स केले. पण याला उत्तर देताना भारताची सुरुवात खराब झाली. वीरेंद्र सेहवाग आणि मुरली विजय झटपट आऊट झाले. या दोघांनाही पॅटिन्सननं क्लिन बोल्ड केलं. पण यानंतर सचिन तेंडुलकर आणि चेतेश्‍वर पुजारानं तिसर्‍या विकेटसाठी 88 रन्सची पार्टनरशिप करत भारताची इनिंग सावरली. पॅटिन्सननं पुजारालाही क्लिन बोल्ड करत ही जोडी फोडली. यानंतर सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीच जोडी जमली. या दोघांनी दुसरा दिवस खेळून काढला. दुसर्‍या दिवसाचा खेळ संपला तेव्हा सचिन तेंडुलकर 71 तर कोहली 50 रन्सवर खेळत होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 23, 2013 04:02 PM IST

भारत 3 विकेट 182 रन्स; सचिन, कोहलीची हाफसेंच्युरी

23 फेब्रुवारी

चेन्नई टेस्टमध्ये भारतानं ऑस्ट्रेलियाला चोख उत्तर दिलं आहे. दुसर्‍या दिवसअखेर भारताने 3 विकेट गमावत 182 रन्स केले आहे. पहिल्या इनिंगमध्ये भारतीय टीम अजून 198 रन्सने पिछाडीवर आहे. चेन्नई टेस्टच्या दुसर्‍या दिवसाचं वैशिष्टय ठरलं ते सचिन तेंडुलकरची हाफ सेंच्युरी आणि ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर जेम्स पॅटिन्सनंची भेदक बॉलिंग.. मायकेल क्लार्कच्या 130 रन्सच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं पहिल्या इनिंगमध्ये 380 रन्स केले. पण याला उत्तर देताना भारताची सुरुवात खराब झाली. वीरेंद्र सेहवाग आणि मुरली विजय झटपट आऊट झाले. या दोघांनाही पॅटिन्सननं क्लिन बोल्ड केलं. पण यानंतर सचिन तेंडुलकर आणि चेतेश्‍वर पुजारानं तिसर्‍या विकेटसाठी 88 रन्सची पार्टनरशिप करत भारताची इनिंग सावरली. पॅटिन्सननं पुजारालाही क्लिन बोल्ड करत ही जोडी फोडली. यानंतर सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीच जोडी जमली. या दोघांनी दुसरा दिवस खेळून काढला. दुसर्‍या दिवसाचा खेळ संपला तेव्हा सचिन तेंडुलकर 71 तर कोहली 50 रन्सवर खेळत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 23, 2013 04:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close