S M L

राणेंच्या पुढच्या वाटचालीविषयी उत्सुकता

7 डिसेंबर, मुंबईकाँग्रेसमधून निलंबित झाल्यानंतर नारायण राणे पुढं काय करणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. स्वतःचा पक्ष काढून , मनसे आणि जन सुराज्य सारख्या पक्षांबरोबर राणे आघाडी बनवतील असही बोललं जातय. त्यामुळेच मुख्यमंत्रीपदाची जबरी महत्त्वाकांक्षा असलेल्या राणेंच्या पुढच्या वाटचालीकडं राजकारणी लक्ष ठेवून आहेत.काँग्रेसकडून अपेक्षाभंग झालेले नारायण राणे त्यांच्या स्वभावानुसार स्वस्थ बसणारे नाहीत. राणे पुढे काय करणार हे अजून स्पष्ट नसल तरी , ते स्वतःचा पक्ष काढणार असल्याची अटकळ बांधली जातेय. आपल्या पक्षाबरोबर मग पश्चिम महाराष्ट्रातले विनय कोरे यांचा जनसुराज्य पक्ष, राज ठाकरेंची मनसे आणि जळगावचे सुरेश दादा जैन यांच्याशी ते आघाडी करू शकतात, अशीही शक्यता वर्तवली जातेय. पश्चिम महाराष्ट्रातले चार आमदार जनसुराज्य पार्टीचे समर्थक आहेत. शिवाय विनय कोरे हे लिंगायत समाजाचे आहेत. लिंगायत मतांचा प्रभाव असलेले 40 मतदार संघ कोरेंनी शोधून ठेवले आहेत. पैशाची मोठी ताकद असलेले कोरे या लिंगायत मतांच्या जोरावर , या 40 मतदारसंघांत चांगलाच प्रभाव टाकू शकतात. सुरेशदादा जैन यांचा प्रभाव जळगाव जिल्ह्यापुरता मर्यादित आहे. मात्र जैन समाजाचे सुरेशदादा कोरेंसोबत आले, तसच राणे आणि राजही एकत्र आले, तर लिंगायत , जैन , मराठा आणि शहरी भागातलं मतदान , एक मोठ राजकीय समीकरण ठरू शकतं,असं या नेत्यांना वाटतय. अर्थातच हे मतदान सेना- भाजपाच्या मतांवर डल्ला मारणारं ठरणार आहे.यातही महत्तवाची गोष्ट म्हणजे, कोरे आणि सुरेशदादा या दोघांनाही बिझनेस मध्ये इंटरेस्ट आहे. राज ठाकरे मुख्यमंत्री बनण्यापेक्षा किंगमेकर बनणेच पसंत करतील.त्यामुळे या संभाव्य आघाडीत, राणेंचा मुख्यमंत्री बनण्याचा मार्गही मोकळा असेल. त्यामुळेच निवडणुकांनंतर त्रिशंकू विधानसभा आल्यास त्याचा फायदा या आघाडीलाच होईल, अशी या नेत्यांची अटकळ आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 7, 2008 05:48 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 7, 2008 05:48 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close