S M L

कोल्हापुरातील रिक्षाचालकांचा संप अखेर मिटला

12 मार्चकोल्हापूर : इथं गेल्या नऊ दिवसांपासून सुरु असलेला रिक्षा चालकांचा संप अखेर आज मिटला. ईलेक्ट्रॉनिक मीटरच्या सक्तीविरोधात हा संप सुरु होता. राज्य सरकारने ई मीटरची सक्ती केली मात्र ते महाग असल्यामुळे परवडण्यासारखे नाही अशी भूमिका घेत रिक्षाचालकांनी बेमुदत संप पुकारला होता. कोल्हापूरच्या लोकप्रतिनिधींनी आणि नेत्यांनी वर्गणीतून ई मीटर देण्याचं मान्य केल्यानं रिक्षा चालकांनी संप मागे घेतला आहे. शहरात 6 हजार रिक्षा असून एका रिक्षाला ई मीटरसाठी 3 हजार रुपये खर्च आहे. त्यामुळे मीटरचा खर्च हा कोट्यवधी रुपये आहे. मात्र आत्तापर्यंत रिक्षा चालकांकडे 50 लाख रुपये जमा झाल्याचं रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींनी सांगितलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 12, 2013 11:01 AM IST

कोल्हापुरातील रिक्षाचालकांचा संप अखेर मिटला

12 मार्च

कोल्हापूर : इथं गेल्या नऊ दिवसांपासून सुरु असलेला रिक्षा चालकांचा संप अखेर आज मिटला. ईलेक्ट्रॉनिक मीटरच्या सक्तीविरोधात हा संप सुरु होता. राज्य सरकारने ई मीटरची सक्ती केली मात्र ते महाग असल्यामुळे परवडण्यासारखे नाही अशी भूमिका घेत रिक्षाचालकांनी बेमुदत संप पुकारला होता. कोल्हापूरच्या लोकप्रतिनिधींनी आणि नेत्यांनी वर्गणीतून ई मीटर देण्याचं मान्य केल्यानं रिक्षा चालकांनी संप मागे घेतला आहे. शहरात 6 हजार रिक्षा असून एका रिक्षाला ई मीटरसाठी 3 हजार रुपये खर्च आहे. त्यामुळे मीटरचा खर्च हा कोट्यवधी रुपये आहे. मात्र आत्तापर्यंत रिक्षा चालकांकडे 50 लाख रुपये जमा झाल्याचं रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींनी सांगितलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 12, 2013 11:01 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close