S M L

हेलिकॉप्टर घोटाळ्याप्रकरणी सीबीआय दाखल करणार FIR?

08 मार्चवादग्रस्त ऑगस्टावेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणी माजी हवाईदल प्रमुख एस पी त्यागी हे अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. एस पी त्यागी, त्यांचे चुलत बंधू, गौतम खेतान आणि प्रवीण बक्षी यांच्या विरोधात फसवणूक आणि लाचखोरीचे गुन्हे नोंदवण्यात येणार आहे अशी सूत्रांनी माहिती दिली आहे. सीबीआयच्या सूत्रांनी सीएनएन आयबीएनला दिलेल्या माहितीनुसार त्यागी यांनी त्यांच्या चुलत भावांकडून लाच घेऊन ऑगस्टा वेस्टलँडला टेंडर प्रक्रीयेत मदत केली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यागी यांचे चुलतबंधू संजीव आणि डोक्सा यांचा संरक्षण खात्यातील खरेदी व्यवहारांमध्ये सहभाग होता.मॉरिशअस आणि ट्युनिशिया इथल्या खोट्या एंजिनिअरिंग कंत्राटांच्या नावाखाली त्यागी बंधूंना लाच देण्यात आल्याचही सूत्रांची माहिती आहे. सीबीआय चौकशी दरम्यान माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ब्रिजेश मिश्रा आणि एसपीजी यांनी टेंडर प्रक्रीया बदलण्याची शिफारस केली होती असा दावा त्यागी यांनी केल्याचीही सूत्रांची माहिती आहे. माजी एसपीजी प्रमुख आणि सध्याचे गोव्याचे राज्यपाल भारत वांछू यांच्यावरदेखील संशयाची सुई सरकली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 8, 2013 04:26 PM IST

हेलिकॉप्टर घोटाळ्याप्रकरणी सीबीआय दाखल करणार FIR?

08 मार्च

वादग्रस्त ऑगस्टावेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणी माजी हवाईदल प्रमुख एस पी त्यागी हे अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. एस पी त्यागी, त्यांचे चुलत बंधू, गौतम खेतान आणि प्रवीण बक्षी यांच्या विरोधात फसवणूक आणि लाचखोरीचे गुन्हे नोंदवण्यात येणार आहे अशी सूत्रांनी माहिती दिली आहे. सीबीआयच्या सूत्रांनी सीएनएन आयबीएनला दिलेल्या माहितीनुसार त्यागी यांनी त्यांच्या चुलत भावांकडून लाच घेऊन ऑगस्टा वेस्टलँडला टेंडर प्रक्रीयेत मदत केली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यागी यांचे चुलतबंधू संजीव आणि डोक्सा यांचा संरक्षण खात्यातील खरेदी व्यवहारांमध्ये सहभाग होता.मॉरिशअस आणि ट्युनिशिया इथल्या खोट्या एंजिनिअरिंग कंत्राटांच्या नावाखाली त्यागी बंधूंना लाच देण्यात आल्याचही सूत्रांची माहिती आहे. सीबीआय चौकशी दरम्यान माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ब्रिजेश मिश्रा आणि एसपीजी यांनी टेंडर प्रक्रीया बदलण्याची शिफारस केली होती असा दावा त्यागी यांनी केल्याचीही सूत्रांची माहिती आहे. माजी एसपीजी प्रमुख आणि सध्याचे गोव्याचे राज्यपाल भारत वांछू यांच्यावरदेखील संशयाची सुई सरकली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 8, 2013 04:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close