S M L

इरोम शर्मिला यांच्यावर आत्महत्येचा आरोप निश्चित

04 मार्चलष्कराच्या विशेष कायद्याविरोधात लढणार्‍या मणिपूरमधल्या सामाजिक कार्यकर्त्या इरोम शर्मिला यांच्यावर आज दिल्ली कोर्टाने आरोप निश्चित केले. त्यांच्यावर आत्महत्येचा प्रयत्न करण्याचा आरोप सहा वर्षांपूर्वी ठेवण्यात आला होता. मात्र, शर्मिलाने आपल्यावरचे आरोप नाकारले होते. उपोषण हा आपला राजकीय लढ्याचा अहिंसात्मक मार्ग आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. तर तिने याआधीच सहा वर्षांचा तुरुंगवास भोगला असल्याने तिच्यावरील आरोप मागे घेण्यात यावेत अशी मागणी तिच्या वकिलाने केली होती. तसेच हा खटला आत्महत्येच्या प्रयत्नांच्या इतर खटल्यांपेक्षा वेगळा असल्याचा युक्तिवादही त्यांनी केला. आपले उपोषण हे अहिंसात्मक राजकीय हत्यार आहे असे तिनं दिल्लीत आल्यानंतर पुन्हा स्पष्ट केलं. लष्कराला विशेषाधिकार देणारा, आर्म्ड फोर्सेस स्पेशन पॉवर्स ऍक्ट रद्द करावा यासाठी ती गेल्या 12 वर्षांपासून उपोषणावर आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 4, 2013 04:47 PM IST

इरोम शर्मिला यांच्यावर आत्महत्येचा आरोप निश्चित

04 मार्च

लष्कराच्या विशेष कायद्याविरोधात लढणार्‍या मणिपूरमधल्या सामाजिक कार्यकर्त्या इरोम शर्मिला यांच्यावर आज दिल्ली कोर्टाने आरोप निश्चित केले. त्यांच्यावर आत्महत्येचा प्रयत्न करण्याचा आरोप सहा वर्षांपूर्वी ठेवण्यात आला होता. मात्र, शर्मिलाने आपल्यावरचे आरोप नाकारले होते. उपोषण हा आपला राजकीय लढ्याचा अहिंसात्मक मार्ग आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. तर तिने याआधीच सहा वर्षांचा तुरुंगवास भोगला असल्याने तिच्यावरील आरोप मागे घेण्यात यावेत अशी मागणी तिच्या वकिलाने केली होती. तसेच हा खटला आत्महत्येच्या प्रयत्नांच्या इतर खटल्यांपेक्षा वेगळा असल्याचा युक्तिवादही त्यांनी केला. आपले उपोषण हे अहिंसात्मक राजकीय हत्यार आहे असे तिनं दिल्लीत आल्यानंतर पुन्हा स्पष्ट केलं. लष्कराला विशेषाधिकार देणारा, आर्म्ड फोर्सेस स्पेशन पॉवर्स ऍक्ट रद्द करावा यासाठी ती गेल्या 12 वर्षांपासून उपोषणावर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 4, 2013 04:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close